Wardha tourism | वर्ध्यात वाढत्या तापमानाचा पर्यटनावर परिणाम; सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली

वर्ध्याचही तापमान 45.5 अशांवर सरकलंय. वाढत्या तापमानामुळं बहुतांश जण घराबाहेर पडणं टाळताहेत. वाढत्या तापमानामुळं उष्माघाताचाही धोका आहे. सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

Wardha tourism | वर्ध्यात वाढत्या तापमानाचा पर्यटनावर परिणाम; सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली
वाढत्या तापमानामुळं सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांचीही संख्या घटल्याच दिसतंय.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:35 PM

वर्धा : मागील काही दिवसांपासून तापमान चांगलंच वाढलंय. उन्हाच्या तप्त झळांनी सगळेच बेजार आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम पर्यटनावरही (Tourism) होतोय. वाढत्या तापमानामुळं सेवाग्राम आश्रमातील (Sevagram Ashram) पर्यटकांचीही संख्या घटल्याच दिसतंय. मागील तीन दिवसांपासून वर्धेच तापमान हे 45 अंशाच्या घरात आहे. यामुळे सगळीकडे लाहीलाही होताना दिसत आहे. पूर्वी मेअखेरीस असं उष्णतामान असायचं. आता एप्रिल महिन्यातच तापमान वाढत आहे. उन्हात बाहेर पडू नये, अस आवाहन सरकारनही केलंय. काळजी घेण्याची गरज असल्याचही सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन प्रभू (T. R. N Prabhu) म्हणालेत.

मोजकेचं पर्यटक देतात भेट

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान वाढलंय. काही जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पारा 45 अंशांच्या पार गेलाय. वर्ध्याचही तापमान 45.5 अशांवर सरकलंय. वाढत्या तापमानामुळं बहुतांश जण घराबाहेर पडणं टाळताहेत. वाढत्या तापमानामुळं उष्माघाताचाही धोका आहे. सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मोजकेच पर्यटक, विद्यार्थी किंवा इतर राज्यांतील व्यक्ती आश्रमाला भेट देतायत. अशी माहिती सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन प्रभू यांनी दिली.

दोन मेपर्यंत उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार 29 एप्रिल ते सोमवार 2 मे या कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी या कालावधीत शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे. शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. बाहेर जाताना कानाला रुमाल बांधावा. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश अकोला जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.