Wardha Health | सेवाग्राम येथे देशातील पहिले प्रसविका प्रशिक्षण केंद्र, देश-विदेशातून 8 प्रशिक्षकांचे पथक रुग्णालयात

प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या सेवेवर सेवाग्राम येथील प्रसविकाचा वॉच राहणार आहे. यासोबतच प्रसविका प्रशिक्षक त्यांना सेवा कालावधीत येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 3 आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांव्यतिरिक्त 5 राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांना देखील यूके येथून प्रसविका प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आले आहे.

Wardha Health | सेवाग्राम येथे देशातील पहिले प्रसविका प्रशिक्षण केंद्र, देश-विदेशातून 8 प्रशिक्षकांचे पथक रुग्णालयात
सेवाग्राम येथे देशातील पहिले प्रसविका प्रशिक्षण केंद्र
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 1:22 PM

वर्धा : प्रसूतीदरम्यान मातांच्या मृत्यूचे प्रमाण व सीजरियनचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सेवाग्राम येथील कस्तुरबा नर्सिंग कॉलेजमध्ये देशातील पहिले राष्ट्रीय प्रसविका प्रशिक्षण केंद्र (एनएमटीआय) (National Maternity Training Center) सुरु करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशभरात सहा प्रसविका प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात कस्तुरबा हेल्थ सोसायटी (Kasturba Health Society) संचालित कस्तुरबा नर्सिंग कॉलेजपासून (Kasturba Nursing College) झालेली आहे. देशभरातील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण देण्यासाठी सेवाग्राम येथे दाखल झाले आहे. प्रसविका प्रशिक्षणच्या पहिल्या तुकडीत 31 प्रशिक्षणार्थी आहेत. यामध्ये बिहार राज्यातील 6, मध्य प्रदेशातील 6, महाराष्ट्रील विविध शहरातील 13 आणि कस्तुरबा रुग्णालयातील 6 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. 6 महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर हे सर्व आपआपल्या राज्यांत परतून सेवा देतील.

लैंगिक आणि प्रजनन आरोग्याबद्दल प्रशिक्षण

प्रसविका हे आरोग्य विज्ञान आहे. जे गर्भधारणेदरम्यान बाळाचा जन्म आणि प्रसूतीनंतरच्या काळात नवजात बालकांच्या काळजीशी संबंधित आहे. याशिवाय यात महिलांच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्य सेवेबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर माता, बालक या दोघांच्याही आरोग्याबाबत समुपदेशन आणि त्यांच्यावर उपचारावर येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्रातील प्रशिक्षित परिचारिका देशभरातील आपली सेवा देणार आहे. ज्या परिचारिकांनी प्रसविका कोर्स पूर्ण केला आहे, अशा परिचारिकांची प्रसूती काळात महत्वाची भूमिका राहणार आहे.

5 राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक

प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या सेवेवर सेवाग्राम येथील प्रसविकाचा वॉच राहणार आहे. यासोबतच प्रसविका प्रशिक्षक त्यांना सेवा कालावधीत येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 3 आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांव्यतिरिक्त 5 राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांना देखील यूके येथून प्रसविका प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आले आहे. जून महिन्यापासून प्रसविका प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे. यामध्ये तांत्रिक दृष्टिकोणातून परदेशातील जपायगो, बिल आणि मेलिंडा गेट फाउंडेशन या संस्था मदत करत आहे. याचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येईल. माता आणि बालकं यांचं आरोग्य सुदृढ ठेवणं आवश्यक आहे. यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.