Wardha : धक्कादायक! पत्नीनेच पतीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले, वर्ध्यातील आरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वर्धा : संशयी वृत्तीच्या पत्नीने थेट आपल्या पतीला गावातीलच एका 14 वर्षीय मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करावयास लावल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून आरोपी दाम्पत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पत्नीनेच पतीला अत्याचार करावयास लावले
मोटोडा (बेनोडा) येथे अल्पवयीन पीडिता ही घरी एकटी हजर असताना आरोपी महिलेने तिला आपल्या घरी बोलावले. पीडिता ही आरोपीच्या घरी येताच आरोपी महिलेने तिला तू माझ्या पतीसोबत लग्न कर, असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून ती घराबाहेर निघून गेली. दरम्यान आरोपी पुरुषाने पीडिता ही एकटी असल्याचे हेरून तिच्यावर जबरी बलात्कार केला. काही वेळानंतर आरोपी पत्नी घरी परतली. त्यानंतर तिने पतीला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावले.
आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सदर प्रकराची माहिती कुणाला दिल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी पीडितेला दिली. आरेापींच्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या पीडितेने घरी पोहोचल्यावर संपूर्ण प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पीडिता व तिच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपी दाम्पत्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 6 तसेच भादंविच्या कलम 376 (3), 76 (2) (एन), 366 (अ), 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. (The wife told the husband to rape the minor girl in wardha)
इतर बातम्या
VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद