Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha News : मंदिरावरील झेंडा बदलत होते, मात्र देवाच्या मनात काही वेगळेच होते, वर्ध्यात काय घडलं?

सणाचा दिवस असल्याने तिघे जण गावातील मंदिरावरील झेंडा उतरवत होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. अचानक जे घडलं त्याने गावात शोककळा पसरली.

Wardha News : मंदिरावरील झेंडा बदलत होते, मात्र देवाच्या मनात काही वेगळेच होते, वर्ध्यात काय घडलं?
वर्ध्यात वीजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 4:36 PM

वर्धा / 30 ऑगस्ट 2023 : मंदिरावरील झेंडा बदलत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. वर्धेच्या पिपरी (मेघे)) येथील तुळजाभवानी मंदिरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. तिघे मंदिरावर चढून झेंडा बदलत असताना झेंड्याच्या खांबाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. अशोक सावरकर, सुरेश झिले, अशोक उर्फ बाळू शेर अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. ऐन सणाच्या दिवशी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

झेंडा बदलत होते पण नियतीच्या मनात वेगळेच होते

आज रक्षाबंधनाचा सण असल्याने गावातील मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी अशोक सावरकर, सुरेश झिले, अशोक उर्फ बाळू शेर हे तिघे जण मंदिरावर चढले होते. झेंडा बदलत असतानाच झेंड्याचा लोखंडी पाईपचा मंदिराच्या वरुन गेलेल्या विद्युत तारांना स्पर्श झाला. यामुळे वीजप्रवाह लोखंडी पाईपमध्ये उतरला. यावेळी हातात झेंडा धरुन असलेल्या तिघांना वीजेचा धक्का लागला. यानंतर तिघेही खाली कोसळले.

तात्काळ रुग्णालयात नेले पण…

तिघांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.