वर्धा : एका खून प्रकरणात दोन आरोपींना जन्मपेठेची शिक्षा (Two convicts were sentenced to life imprisonment) झाली. ती शिक्षा भोगत असताना हे सुटीवर गेले. दोघांनीही संगनमत करून खून केला होता. तसेच दोघांनीही संघनमत करून जेलमध्ये परत न जाण्याचा निर्णय घेतला. गेली चौदा वर्षे त्यांनी बाहेर काढले. पण, शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडलेच. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आता पुन्हा त्यांना जेलमध्ये खडी फोडावी लागणार आहे. वर्धा येथील साईनगरचे (at Sainagar, Wardha) सुनील उर्फ सनी रमेशचंद्र झाडे (वय 37) व राहुल रमेशचंद्र झाडे (वय 39) हे दोन आरोपी आहेत. एका खून प्रकरणात हे दोघेही नागपूर कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होते. 2008 मध्ये ते संचीत रजेवर आले. संचित रजा भोगून दोघांनीही कारागृहात हजर व्हायला पाहिजे होते. परंतु, तो रजेचा कालावधी संपूनसुध्दा मध्यवर्ती कारागृह नागपूर (Nagpur Central Jail) येथे परत गेले नाही.
तेव्हापासून फरार असल्याने त्यांच्याविरूध्द वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपींस पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून वर्धा जिल्हा फरार बंदी अभिलेखावर समाविष्ट करण्यात आले. पोलिसांनी आरोपींचा सातत्याने व कसोशीने शोध घेतला. त्यांचा पाठपुरवठा करून त्यांच्याबाबत अधिकाअधिक माहिती मिळविली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फरार बंदी सुनील झाडे आणि फरार बंदी राहुल झाडे या दोघांना ठाणे जिल्ह्यातील पोद्दार सोसायटी बदलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कार्यवाहीकरिता वर्धा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आता पुन्हा त्यांना कैदेतच दिवस काढावे लागणार आहेत. एखाद्याचा खून करून जीवन संपविणे त्यांना सोपे वाटले असेल. आता शिक्षा भोगताना त्यांना त्यांचे जुने दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही.