Wardha Drowned : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, दोन युवकांचा बुडून मृत्यू तर दोघे बचावले, हिंगणघाट तालुक्याच्या हिवरा येथील घटना
रविवारी पिपरी येथील रुतीक पोकळे, संघर्ष लढे, रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे चार जीवलग मित्र आजनसरा येथून दुचाकीने हिवरा गावात असलेल्या वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते. मात्र, या चौघा मित्रांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने चारही युवक नदीत बुडाले.
वर्धा : नदीत पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी दोन युवकां (Two Youth)चा नदीपात्रात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. तर दोन युवक बचावले आहेत. हिंगणघाट तालुक्याच्या हिवरा येथील नदीपात्रात ही घटना घडली आहे. रुतिक नरेश पोखळे (21) आणि संघर्ष चंदू लढे (18) अशी दोघा मयत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण पिपरी येथील रहिवासी आहेत. तर दोन तरुण बचावले असून रणजित रामजी धाबर्डे (28) आणि शुभम सुधाकर लढे (26) अशी त्यांची नावे आहेत. (Two young men who went for a swim drowned in the river in wardha)
नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने चारही युवक बुडाले
रविवारी पिपरी येथील रुतीक पोकळे, संघर्ष लढे, रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे चार जीवलग मित्र आजनसरा येथून दुचाकीने हिवरा गावात असलेल्या वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते. मात्र, या चौघा मित्रांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने चारही युवक नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदू लढे या दोघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. तर रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे दोघे बचावले आहेत. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सोलापुरात ऊसतोड कामगारांच्या 3 मुलांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू
कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊस तोडणी मजुराच्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे ही घटना घडली आहे. आष्टी येथील व्यवहारे वस्तीवर लोकनेते साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांची पालं पडली आहेत. त्यात परभणी जिल्ह्यातील गायकवाड आणि जाधव परिवारातील सदस्य ऊस तोडणी कामगार म्हणून कामाला आले आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे ऊस तोडणी मजूर मुलांना कोप्यांवर ठेवून फडावर गेले. त्यानंतर पालावरील रेणुका अंकुश जाधव (17), चुलत भाऊ अजय बाळू जाधव (5) आणि सुरेखा हिरामत गायकवाड असे तिघे ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेले अन् ओढ्याच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. (Two young men who went for a swim drowned in the river in wardha)
इतर बातम्या
अकोल्यात जातीचे खोटे प्रमाणपत्रावर महाबीजमध्ये नोकरी मिळवणाऱ्या 11 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई
Malegaon Accident : मालेगावात टेम्पोचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार तर 15 जखमी, घटना कशी घडली?