Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Market | बाजार समिती कार्यालयात भाजीविक्रेत्यांचा ठिय्या, बाजार बजाज चौकात नको; वर्ध्यात शेतकरीही आक्रमक

पावसाच्या पाण्याने भाजीपाला खराब होतो. त्यामुळे बाजार समितीतच भाजीची विक्री करु द्या, या मागणीसाठी बाळकृष्ण माऊस्कर यांच्या नेतृत्वात भाजीविक्रेत्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Wardha Market | बाजार समिती कार्यालयात भाजीविक्रेत्यांचा ठिय्या, बाजार बजाज चौकात नको; वर्ध्यात शेतकरीही आक्रमक
बाजार समिती कार्यालयात भाजीविक्रेत्यांचा ठिय्या
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 7:11 PM

वर्धा : कोरोना काळात बजाज चौकात असणारा भाजी बाजार बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, आता पुन्हा सदर बाजार बजाज चौकात ( Bajaj Chowk) स्थलांतरित करण्याचा आदेश देण्यात आला. बजाज चौकात भाजी बाजार गेल्यास शेतकऱ्यांना माल वाहतुकीस अडचण निर्माण होईल. भाजीपाला शेतकरी दररोज भाजी घेऊन येतो. मात्र, बजाज चौकातील बाजारात त्यांची कोंडी होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) परिसरातच आम्हाला भाजी विकू द्या, अशी मागणी करण्यात आली. पुढे पावसाळ्याचे दिवस असल्याने जुन्या भाजी बाजारात चिखल साचतो. वाहने फसतात. वाहतूक पोलिसांचा त्रास होतो. चालानमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पार्किंगची व्यवस्था नाही. पाण्याची व्यवस्था नाही. वाहतूक कोंडी (Traffic Congestion) होत असल्याने हमालही मिळत नाही. त्यामुळे बाजार स्थलांतराचा आदेश रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

स्थलांतराचा आदेश रद्द करण्याची मागणी

बजाज चौकात असलेल्या जुन्या भाजी बाजारात शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. माल वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होते. पुढे पावसाळा असून पावसाच्या पाण्याने भाजीपाला खराब होतो. त्यामुळे बाजार समितीतच भाजीची विक्री करु द्या, या मागणीसाठी बाळकृष्ण माऊस्कर यांच्या नेतृत्वात भाजीविक्रेत्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. भाजी बाजार स्थलांतराचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बाजार समिती प्रशासकाने काढले पत्र

शेतकरी आणि भाजीविक्रेत्यांच्या आंदोलनाची दखल घेत बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांची चर्चा केली. त्यांची अडचण लक्षात घेता भाजी बाजाराचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तोपर्यंत सध्या भरत असलेला भाजीबाजार पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात आहे. त्याच ठिकाणी निश्चित केलेल्या जागेत सुरु राहील. मात्र, यामुळे बाजार समितीच्या कामकाजात अडचण निर्माण होणार नाही. याची दक्षता घेण्याचे पत्र बाजार समितीच्या प्रशासकांनी काढले आहे.

हे सुद्धा वाचा

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.