Video : Wardha Tribal Dance | वर्ध्यातील राहुल-अबोलीच्या गोंडी नृत्याचा व्हिडीओ चर्चेत, नवदाम्पत्यानं पारंपरिक नृत्यावर धरला ठेका
अबोली आणि राहूल या दोघांचेही पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. लग्न सोहळ्यात अनेक जण डिजे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र, आपली संस्कृती काय आहे, लोककला काय आहे. याची माहिती देण्यासाठी इवनाथे कुटुंबीयाने लग्न सोहळयादरम्यान पारंपरिक असलेल्या गोंडी नृत्याचे आयोजन केले होते.
वर्धा : लग्न म्हटलं की तोच डीजेच्या कानथळ्या बसवणारा आवाज. जोरात वाजणारी गाणी आणी धांगडधिंगा करत वेडेवाकडे नाचणारे. असंच चित्र डोळ्यापुढे येते. पण अनेक जण लग्नही हटके करण्याचा प्रयत्न करतात. आदिवासी लोककलेची परंपरा जपत तसेच समाजात पारंपरिक नृत्याची संस्कृती रुजविण्यासाठी काही जण प्रयत्न करतात. आर्वी तालुक्यातील पिपंळखुटा (Pimpalkhuta) येथे आयोजित लग्न सोहळयात नवदाम्पत्याने चक्क गोंडी नृत्याच्या तालावर ठेका धरला. लोककलेच्या गोंडी नृत्यावर राहूल-अबोली (Rahul-Aboli) या नवदाम्पत्याने तुफान डान्स केला. कलाकारांसह (Artist) सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही द्विगुणीत झाल्याचे दिसून आले. सध्या सोशल मीडियावर नवरा-नवरीच्या आदिवासी नृत्याची समाज माध्यमावर धूम पाहावयास मिळत आहे. नृत्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
आदिवासी नृत्य वर्धा pic.twitter.com/YqeIvnouE6
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) May 22, 2022
स्टेजवर गोंडी नृत्य सादर
आर्वी तालुक्याच्या पिंपळखुटा येथील दिवाकर इवनाथे यांची कन्या अबोली हिचा विवाह सोहळा केळझर येथील राहूल गजानन उईके याच्याशी पिंपळखुटा गावात नुकताच पार पडला. अबोली आणि राहूल या दोघांचेही पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. लग्न सोहळ्यात अनेक जण डिजे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र, आपली संस्कृती काय आहे, लोककला काय आहे. याची माहिती देण्यासाठी इवनाथे कुटुंबीयाने लग्न सोहळयादरम्यान पारंपरिक असलेल्या गोंडी नृत्याचे आयोजन केले होते. वरुड येथील दहा कलाकारांनी लग्न सोहळयात स्टेजवर गोंडी नृत्य सादर करुन पारंपरिक संस्कृतीला पुनरुर्जीवीत केले.
दाम्पत्यानेही गोंडी नृत्यावर धरला ठेका
पारंपरिक गोंडी नृत्य आज लोप पावत चालले आहे. असे असताना वरुड येथील पाच मुलं आणि पाच मुली अशा दहा जणांच्या गृपने लग्न सोहळयात चांगलीच ऊर्जा निर्माण केली होती. नवरदेव आणि नवरी यांनी लग्न मंडपात प्रवेश केल्यावर नव दाम्पत्यानेही गोंडी नृत्याच्या तालावर चांगलाच ठेका धरला. त्यांचा हा डान्स पाहून सोहळ्याला उपस्थित असलेल्यांनीही त्यांचे कौतुक केले. नवदाम्पत्याचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हजारो लोकं या व्हिडीओला पसंती देत आहेत.