Wardha Abortion | आर्वी गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाकडून कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार, शल्य चिकित्सकांकडून असहकार्य

आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांचा कसून तपास सुरु आहे. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मात्र आरोग्य विभागाशी निगडित असलेल्या या प्रकरणात आरोग्य विभाग तपासाचा आव आणत केवळ कागदी घोडे नाचवताना दिसत आहे.

Wardha Abortion | आर्वी गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाकडून कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार, शल्य चिकित्सकांकडून असहकार्य
Arvi abortion
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 3:11 PM

वर्धाः आर्वी (Arvi) येथील कदम रुग्णालयात झालेल्या अवैध गर्भपात (Wardha Abortion) प्रकरणात पोलिसांचा (Maharashtra Police) कसून तपास सुरु आहे. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मात्र आरोग्य (Health) विभागाशी निगडित असलेल्या या प्रकरणात आरोग्य विभाग तपासाचा आव आणत केवळ कागदी घोडे नाचवताना दिसत आहे. तर आरोग्य विभाग तपासात पाहिजे तसे पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कदम रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे.

या मशीनचा डाटा तपासण्याकरिता पोलिसांनी रेडिओलॉजिस्टची आवश्यकता असल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलिसांनी आठ दिवसा अगोदर पत्र देऊनही जिल्हा शल्यचिकित्सकांनी रेडिओलॉजिस्ट अद्याप उपलब्ध करून दिला नाही. तर याप्रकरणातील डॉ. रेखा कदम यांनी पीडितेचा गर्भपात करीत असल्याबाबत आरोग्य विभागाकडे नोंदणी केली आहे का याची माहिती विचारूनही अद्याप जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.

तपासासाठी रेडिओलॉजिस्ट मिळत नाही

आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या गर्भापात प्रकरणात पोलिसांनी तपास करून आतापर्यंत सहा आरोपीना अटक केली आहे. या प्रकरणातील जी अल्पवयीन पीडिता आहे ती पाच महिन्याची गरोदर होती. तिच्याकडून 30 हजार रुपये घेऊन डॉ. रेखा कदम हिने गर्भपात केले होता. या घटनेच्या तपासदरम्यान आर्वी पोलिसांनी 12 जानेवारीला कदम रुग्णालयाच्या गर्भ केंद्राची तपासणी करून पंचनामा केला होता. त्यावेळी तेथील सोनोग्राफी मशीन पोलिसांनी जप्त केली होती. त्यामुळे या सोनोग्राफी मशीनमध्ये पीडितेचे सोनोग्राफीचे अहवाल जतन केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सोनोग्राफी मशीनची तपासणी करून पीडितेचे अहवाल मिळविण्यासाठी रेडिओलॉजिस्ट तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती पोलीस निरीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. याबाबतचे पत्र आर्वी पोलिसांनी 14 जानेवारीला जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले होते. मात्र अद्याप रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देण्यात आला नाही.

एवढी दिरंगाई का ? आणि कशासाठी ?

तसेच या प्रकरणात अटक केलेल्या डॉ. रेखा कदम यांनी गर्भपात करण्याबाबत नोंदणी केली आहे का याची माहिती जिल्हा शल्य चिकित्साकांकडून 13 जानेवारीला मागविण्यात आले होते मात्र यावरही जिल्हा शल्य चिकित्सांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या अहवालाबाबत त्यांच्याकडून माहिता करून घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोलीस गेले असता सध्या आपण कामात असल्याचे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

कदम रुग्णलयाच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तरीही आरोग्य विभागाकडून तपासात दिरंगाई होत असल्याने कदम यांना वाचविण्यासाठी तर ही दिरंगाई होत नाही ना असा सवालही उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

Nashik Corona : कोरोनाचा गुणाकार थांबेना; काय आहे नाशिक जिल्ह्याचा आजचा रिपोर्ट, घ्या जाणून…!

Varsha Gaikwad : पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, सीबीएसईच्या धर्तीवर शिक्षण देणार : वर्षा गायकवाड

रणजितसिंह डिसलेंचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा, वर्षा गायकवाड यांच्याकडून रजा मंजुरीचे आदेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.