Wardha Bapu Kuti : वर्ध्यातील बापूकुटीच्या भिंतींना सिंदीच्या पानांचं आच्छादन, भिंती खराब होऊ नये म्हणून पाच हजार पानोळ्याचा वापर
सेवाग्राम आश्रमाची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. त्याचं जतन पारंपरिक पध्द्तीन करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं आजही आश्रमात परंपरांचा ठेवा जपला जात आहे.
वर्धा – पावसाळा म्हटलं की मातीच्या घरांचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात. वर्ध्यातील (Wardha) सेवाग्राम आश्रमातील (Sevagram Ashram) कुटींच्या (Kuti) भिंती मातीच्या असल्यानं त्यांचं जतन करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच याच परिसरातील सिंदीच्या झाडाच्या पानांच्या झाडपीच(झांज्याच) आच्छादन करून भिंतींच संरक्षण केलं जातंय. या आच्छादन करिता बनविण्यात येणाऱ्या झांज्यानामध्ये पाच हजार सिंदीच्या पानांचा वापर केला जातो. एकदा या झांज्या तयार केल्या तर ते तीन वर्षापर्यंत पावसाळ्यात उपयोगात येतात.तीन वर्षांनी पुन्हा नव्याने तयार कराव्या लागतात. पावसाळ्यापूर्वी ही उपाययोजना करून ऐतिहासिक वास्तूचे जतन केले जाते.
ऐतिहासिक वास्तूच संरक्षण केल जातं
1936 मध्ये महात्मा गांधी सेवाग्रामात आले. गांधींजीनी स्वतःच्या कुटीच निर्माण स्थानिक वस्तूपासून आणि स्थानिक लोकांच्या मदतीन व्हावा ही इच्छा होती. त्यावेळेस महात्मा गांधींची पहिली कुटी मात्र 100 रुपयात बनवण्यात आली. सेवाग्राम आश्रमात जेव्हा कुटीचं काम करण्यात आलं तेव्हा स्थानिक वस्तूंचा वापर करण्यात आला. त्यात लाकुड फाटा असो की इतर साहित्य आणि मजूर यांच्या साहाय्यान बनविण्याचा महात्मा गांधींचा आग्रह होता. त्यामुळे 85 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही इथल्याचं वस्तूंचा उपयोग करत ऐतिहासिक वास्तूच संरक्षण केल जातं.
बापूंच्या विचाराप्रमाणे आजही ही त्यांच्या कुटीच रक्षण केले जातं
बापूंच्या विचाराप्रमाणे आजही ही त्यांच्या कुटीच रक्षण केले जातं आहे. पहिले वर्धा जिल्ह्याच्या जुनोना येथून सिंदीची पाने आणली जातं होती मात्र तिथे यंदा झाडे कमी असल्याने पूजई येथून आणलीय. बाबूच्या मदतीने या झांज्या तयार केल्या जातात. कुटीसह येणाऱ्या दर्शनार्थी यांना पाणी लागू नये याकरिता ही उपाययोजना आश्रमकडून केल्या जातात अशी माहिती आकाश लोखंडे यांनी सांगितली.
त्यामुळं भिंतींपर्यंत पावसाचं पाणी पोहचत नाही
पाण्यापासून बचावाकरिता लावलेल्या या सिंदीच्या पानांचा आकार टोकदार असते. या पानांची उतरत्या पद्धतीनं बांबूच्या कड्यांवर ठेवून झांजी ही मातीच्या भिंतीवर आच्छादित करतात, त्यामुळ भिंतींपर्यंत पावसाचं पाणी पोहचत नाही. अशाच प्रकारे दरवर्षी हा उपक्रम राबवत याच पद्धतीनं ऐतिहासिक ठेवा जपला जातोय. जेणेकरून येणाऱ्या पिढीला आहे त्याच परिस्थितीतच हा वारसा पाहायला मिळो असं सोनल जिचकार यांनी सांगितले.
सेवाग्राम आश्रमाची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. त्याचं जतन पारंपरिक पध्द्तीन करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं आजही आश्रमात परंपरांचा ठेवा जपला जात आहे.