Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Murder : बर्थडे साजरा करून जात असलेल्या युवकाचा खून! कारण? बाईकचा कट लागला म्हणून…

Wardha Murder News : मयूरने अक्षयला 'मारा रे याला जास्त शहाणा झाला' असं म्हणत जवळील चाकू काढून अक्षयच्या पोटात भोसकला.

Wardha Murder : बर्थडे साजरा करून जात असलेल्या युवकाचा खून! कारण? बाईकचा कट लागला म्हणून...
खळबळजनक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 2:40 PM

वर्धा : मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करुन त्याला केक भरवून रात्रीच्या सुमारास घराकडे जात असतानाच खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात (Wardha News) घडली. तीन दुचाकींवर आलेल्या आठ आरोपींनी अवघ्या 23 वर्षीय युवकाची हत्या (Wardha Murder) केलीय. दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून झालेल्या क्षुल्लक वाद टोकाला गेला. आणि त्यातूनच हे हत्याकांड (Wardha Crime News) घडलं. युवकाच्या पोटात चाकू भोसकून त्याचा कोथळाच बाहेर काढण्याता आल्यानं संपूर्ण वर्धा जिल्हा हादरु गेलाय. ही घटना सोमवारी पहाटे मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. गोरसभंडार कॉलनी जवळ असलेल्या जुन्या आरटीओ मैदानालगतच्या रस्त्यावर हा थरारक हत्याकाडांचा प्रकार घडल्याचं उघडकीस आलाय. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यातील पाच जण अल्पवयीन आहेत. अल्पवयीन पाच आरोपीसह ऋषिकेश दिनेश बहेणवाल आणि निलेश मनोहर पटेल यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपी मयूर गिरी याचा पोलीस शोध घेत आहे. अक्षय मनोज सोनटक्के असे मृत तरुणाचं नाव आहे. तो संत तुकाराम वॉर्ड रामनगर इथं राहणारा असून अक्षय 23 वर्षांचा होता.

दुचाकीला कट मारला म्हणून…

अमोल तामगाडगे (रा. हिंदनगर) याचा वाढदिवस असल्याने मृतक अक्षय सोनटक्के आणि त्याचे काही मित्र हे दुचाकीने जून्या आरटीओ कार्यालयाजवळील मैदानात केक कापण्यासाठी गेले होते. अमोलने केक कापला असता सर्व मित्र त्याला केक भरवित होते. दरम्यान मृतक अक्षय हा मैदानाबाहेर निघाला आणि दुचाकीने घरी जात असतानाच तुकडोजी मैदानाकडून आलेल्या तीन दुचाक्या त्याच्याजवळ थांबल्या. दुचाकीला कट का मारला, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरु केली.

तेवढ्यातच मुख्य आरोपी मयुर गिरी (रा. आनंदनगर) याने जवळील चाकू काढून अक्षयच्या पोटात भोसकला. ही बाब वाढदिवस साजरा करणाऱ्या त्याच्या मित्रांना समजताच त्यांनी धाव घेत अक्षयला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हे सुद्धा वाचा

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनामा करुन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाबही नोंदवले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले तर ऋषिकेश दिनेश बहेणवाल आणि निलेश मनोहर पटेल यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी मयूर गिरी याचा शोध सूरु आहे.

धक्कादायक…

मृतक अक्षय सोनटक्के याला आरोपी मयूर गिरी आणि त्याच्या इतर सात मित्रांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान मयूरने अक्षयला ‘मारा रे याला जास्त शहाणा झाला’ असं म्हणत जवळील चाकू काढून अक्षयच्या पोटात भोसकला. दरम्यान मृतक अक्षक हा ‘मला वाचवा, वाचवा’ असा ओरडत होता. तेवढ्यातच वाढदिवस साजरा करणारे मित्र धावत गेल्याने आरोपीनी दुचाकीवरुन धूम ठोकली.

मृतक अक्षयला जिवे ठार मारल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यान आरोपींनी त्याच परिसरात राहणारा आरोपी निलेश मनोहर पटेल (29) याला माहिती दिली. दरम्यान निलेशने घटनास्थळी जात रस्त्यावर पडून असलेल्या रक्तावर माती टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल करुन त्यास बेड्या ठोकल्या.

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.