Wardha attack : वर्ध्यातील एका वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला! गाडी अडवून जबर मारहाण

Wardha attack on editor: वर्ध्यातून सेलूला जात असतेवेळी कार अडवून अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी कारचालकासह वृत्तपत्राच्या संपादकांनाही मारहाण करण्यात आली.

Wardha attack : वर्ध्यातील एका वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला! गाडी अडवून जबर मारहाण
वर्धामधील खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 7:05 AM

वर्धा : बुलढाण्यातील खामगावात पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार जानेवारी महिन्यात घडला होता. त्यानंतर आता वर्ध्यातून (Wardha news) खळबळजनक घटना समोर आली आहे. वर्ध्यातील एका वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला (Attack on Editor in Wardha) करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर टी पॉईंटवर (Dattapur Tea Point in Wardha) हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वर्ध्यातून सेलूला जात असतेवेळी कार अडवून अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी कारचालकासह वृत्तपत्राच्या संपादकांनाही मारहाण करण्यात आली. तर गाडीचीही तोडफोड केली गेली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत गुन्हाही नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत. वर्ध्यात या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका का करण्यात आला, ह कळू शकलेलं नाही.

प्राणघातक हल्ला झालेली व्यक्त कोण?

वर्ध्याच्या दत्तपूर टी पॉईंट वर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात रवीद्र कोटंबकर हे गंभीर जखमी झाले. रवींद्र कोटंबकर हे वर्धामधील एका वृत्तपत्राचे संपादक आहेत.

नेमका हल्ला कसा झाला?

वर्ध्यावरुन कोटंबकर हे सेलूला जात होते. त्यावेळी अज्ञातांनी कार अडवली आणि कोटंबकर यांना मारहाण केली. तसंच कोटंबकर यांच्या ड्रायवरलाही मारहाण करत गाडीची सुद्धा तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात कोटंबकर यांच्या डोक्यावर, पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. एकूण 10 ते 12 हल्लेखोरांनी मिळून ही मारहाण केली असल्याची माहित समोर आली आहे. सध्या जखमी कोटंबकर यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात सुरु उपचार आहेत.

सेवाग्राम पोलिसांत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या हल्लाप्रकरणी आता अधिक तपास केला जातो आहे. कलम 307 , 143 , 148 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच अज्ञात हल्लेखोर आरोपींच्या शोधात पोलिसांची पथकं रवाना केली आहेत. या हल्लेखोरांना पकडण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

संबंधित बातम्या :

वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायाची गळफास घेत आत्महत्या

Wardha Crime : महामार्गांवर लुटमार, कुटुंबासोबत देवदर्शन; अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले, पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.