वर्धा : क्लासला जाताना एका विद्यार्थ्याला लुटण्यात (Wardha crime News) आल्याचा घटना उघडकीस आली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या तरुणाला लुटण्यात आलं. या मुलाकडील मोबालई फोन आणि रोख रक्कम चोरुन दोघांनी पळ काढलाय. लुटमार करणाऱ्या या चोरट्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये (Student loot) दहशत पसरली आहे. 25 मे रोजी घडलेली घटना आता उघडकीस आली आहे. तसंच लुटमार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी (Sevagram Police) बेड्याही ठोकल्या आहेत. शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा रस्ता अडवून त्याला दोघांनी पत्ता विचारता होता. त्यानंतर या तरुणाचा मोबाईल फोन आणि त्याच्याकडे असलेली रोख रक्कम घेऊन दोघांनी पळ काढला होता. वर्ध्यातील कुटकी फाट्यावर ही घटना घडली होती. दरम्यान, या घटनेमुळे आता क्लासला जात असताना विद्यार्थ्यांनी खबरदारी बाळगण्याची गरज व्यक्त केली जातेय.
सूरज सुरेश नगराळे हा 17 वर्षांचा विद्यार्थी कुटकी तळोही इथं शिकवणीला जायला निघाला होता. कुटकी फाट्यावर वाहनाची वाट पाहत उभा असताना सेवाग्रामकडून एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर तिघे आले. विद्यार्थ्याकडे नागपूरकडे जाण्याचा मार्ग विचारु लागले. मुलगा मार्ग सांगत असतानाच दुचाकीवरील एका युवकाने चाकूचा धाक दाखवून मुलाकडे पैशाची मागणी केली. तसेच त्याच्याजवळील पाचशे रुपये रोख आणि मोबाईल असा एकूण पंधराशे रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला.
या प्रकरणाचा सेवाग्राम पोलिसांनी तपास करुन दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. विद्यार्थ्याकडून गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम आणि मोबाईल तसेच MH 31 EX 7851 क्रमाकांची दुचाकी असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केलाय.
या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. सध्या या दोघांचीही कसून चौकशी केली जात असून त्यांनी इतरही अनेकांना अशाप्रकारे लुटलं असण्याचा संशय पोलिसांना आहे.