Wardha river bridge : आर्वी कौढण्यपूर मार्गावर वर्धा नदीचा पूल, पुलावरील डांबरीकरण पुरात गेले वाहून, दृश्य कॅमेऱ्यात कैद

आज सकाळपासून या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गांवरील वाहतूक खोळंबली आहे. आता पुलावरील डांबरीकरण वाहून गेल्याने हा पूल खचल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे.

Wardha river bridge : आर्वी कौढण्यपूर मार्गावर वर्धा नदीचा पूल, पुलावरील डांबरीकरण पुरात गेले वाहून, दृश्य कॅमेऱ्यात कैद
पुलावरील डांबरीकरण पुरात गेले वाहूनImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 6:44 PM

वर्धा : मध्यरात्रीपासून पावसाने जिल्ह्याला चांगलच झोडपून काढलं आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्यानी धोक्याची पातळी (danger level) ओलांडली आहे. अश्यातच धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने (doors open) वर्धा नदीला पूर आलाय. या पुरामुळे आर्वी कौढण्यपूर मार्ग (arvi kaudhanyapur road) वर्धा नदीच्या पुलावर पाणी असल्याने बंद झालाय. पाण्याच्या प्रवाहात याच पुलावरील डांबरीकरण वाहून जातानाच दृश्य कॅमेरात कैद झाला आहे.

या मार्गावरील वाहतूक बंद

आज सकाळपासून या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गांवरील वाहतूक खोळंबली आहे. आता पुलावरील डांबरीकरण वाहून गेल्याने हा पूल खचल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे. पुराचे पाणी ओसरल्यावर या पुलाचे किती नुकसान झाले हे कळेल. मात्र सध्यातरी या मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ

मोर्शीमार्गे अमरावती व वर्धा जिल्ह्याचा संपर्क तुटला

मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणामध्ये पाणीसाठा 89 टक्के पुढे गेला आहे. त्यामुळे धरणाचे सर्वच 13 ही दरवाजे पहिल्यांदा तब्बल 230 सेमी उघडल्यामुळे मोर्शीवरून वर्धाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सात फूट पाणी आले. त्यामुळं मोर्शीवरून अमरावती व वर्धा जिल्हाचा संपर्क तुटला. अप्पर वर्धाच्या पुलावरून पाणी जात असल्याने मोर्शी व आष्टीची वाहतूक सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे, तर या धरणाचे पाणी वर्धा नदीला सोडण्यात आल्याने वर्धा नदीला महापूर आला आहे.

भंडाऱ्यातील धनेगावात पाच घरे जमीनदोस्त

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील धनेगाव जंगल परिसरात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळं धनेगाव, सोनेगाव ही गावे जलमय झाली आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पाऊस दमदार आल्याने विद्युत सुध्दा गेली होती. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पाहिल्यावर गावातील रस्त्यांवर जणू नदी वाहत असल्याचे दिसून आले. हळूहळू संपूर्ण गाव जागा झाला व पाहता पाहता लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. या पावसाच्या पाण्यामुळे धनेगाव येथील चार ते पाच घरे जमीनदोस्त झाली आहेत. याची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली. तहसीलदार हे स्वतः घटनास्थळी पोहचले. या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सद्या कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.