Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: नशीब वेळीच गाडीबाहेर पडले, नाहीतर…? Holiसाठी यवतमाळहून वर्ध्याला जाताना भररस्त्यात अग्नितांडव

Wardha Car fire : यावेळी कार सेलसुरा शिवारातील पुलाजवळ आली असता कारच्या पुढील भागातून आगीचे लोळ उठत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकानं तातडीने वाहन थांबवून सर्वांना वाहनाबाहेर निघण्यास सांगितले.

Video: नशीब वेळीच गाडीबाहेर पडले, नाहीतर...? Holiसाठी यवतमाळहून वर्ध्याला जाताना भररस्त्यात अग्नितांडव
वर्ध्यात कारचा बघताक्षणी कोळसाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 8:39 PM

वर्धा : नागपूर-तुळजापूर मार्गावर भीषण दुर्घटना घडली. एका गाडीनं अचानक रस्त्यावरच पेट घेतला. यानंतर अवघ्या 20 मिनिटांच्या आत कार जळून खाक (Fire in Car) झाली. यवतमाळचं (Yavatmal) दुधे कुटुंब यातून थोडक्यात बचावलंय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा भररस्त्यातच गाडीतून निघत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. चालकासह गाडीतील सर्वजणांनी वेळी गाडीच्या बाहेर उतरतलामुळे मोठा अनर्थ टळलाय. होळीच्या (Holi) निमित्त  यवतमाळचं दुधे कुटुंब हे मुलीकडे जात होतं. त्यावेळी सेलसुरा शिवाराजवळ ही घटना घडली. गाडीच्या इंजिनमधून संशयास्पद प्रकार दिसल्यानं चालकानं गाडी थांबवली. यानंतर गाडीतील सगळेच प्रवासी गाडीतून उतरले. यानंतर गाडीनं मोठा पेट घेतला. यात गाडीचा काही मिनिटांच्या आत कोळसा झालाय.

थोडक्यात बचावले!

होळीचे औचित्य साधून मुलीला गाठी-चोळी देण्याची प्रथा आहे. हीच प्रथा पूर्ण करण्यासाठी यवतमाळ येथील दुधे कुटुंबीय कारने यवतमाळकडून वर्धेच्या दिशेने जात होते. कारमधील चालक सुनील भगत, प्रणय दुधे, जयंत दुधे, विक्की गायकवाड, संजुमाला दुधे, सतिका दुधे हे गप्पा गोष्टी करीत प्रवास करत होते.

भररस्त्यात अग्नितांडव!

यावेळी कार सेलसुरा शिवारातील पुलाजवळ आली असता कारच्या पुढील भागातून आगीचे लोळ उठत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकानं तातडीने वाहन थांबवून सर्वांना वाहनाबाहेर निघण्यास सांगितले. वाहनातील सर्वच व्यक्ती बाहेर येताच आगीने रौद्ररूप धारण केलं. संपूर्ण कारला आपल्या कवेत घेतले. भर रस्त्यात कार जळत असल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

पाऊणतासानंतर आगीवर नियंत्रण

भररस्त्यातच गाडीत अग्नितांडव सुरु होता. याची माहिती देवळीच्या अग्निशमन विभागाला तातडीनं देण्यात आली. माहिती मिळताच देवळीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. सुमारे पाऊण तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारातून दुधे कुटुंब थोडक्याच बचावलंय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अपघातस्थळावरुन परत येत असतानाच अपघात! 3 पोलीस जखमी, थोडक्यात बचावले

अकोल्यातले चोर “तिसऱ्या डोळ्याला”ही घाबरेनात, चोरांच्या रडारावर आता मंदिरातल्या दानपेट्या

नदीवर जीव द्यायला गेला मात्र तिथं देवदूत आला, युवकाला वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....