Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car

एकनाथ शिंदे म्हणाले, महामार्गच काम अतिशय उत्कृष्ट झालंय. 120 च्या गतीने वाहन चालवून सुद्धा 60 ते 70 च्या गतीने वाहन चालवत असल्याचं वाटत होतं. रस्ता इको फ्रेंडली केल्या जातं असून साडेअकरा लाख झाड लावले जातं आहेत. वर्ध्यात समृद्धी महामार्गाचे 58 किलोमीटरचं काम पूर्ण झालं.

Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car
वर्धा येथे समृद्धी महामार्गावरून कार चालविताना मंत्री एकनाथ शिंदे Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 4:42 PM

वर्धा : येथे समृद्धी महामार्गावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी स्वतः कार चालवत पाहणी केली. या कामाची पाहणी करण्यासाठी शिंदे वर्धा येथे आले होते. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा (Nagpur Mumbai Samrudhi Highway) पहिला टप्पा हा मे महिन्यात सुरू होणार आहे. दुसरा टप्पा हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून इडी, सीबीआय चौकशीचे फेरे सुरू आहेत. पण त्याच्यामध्ये सरकारला काही अडचण होणार नाही. सरकार पूर्णपणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) साहेबांच्या नेतृत्वात काम करतंय. कोविड, निसर्ग वादळ, चक्रीवादळ सारखे संकट आले तरी सुध्दा विकासाची गती कुठे थांबू दिली नाही. शिर्डी समोर मोठ्या प्रमाणात डोंगर असल्याने कामाला वेळ लागतोय, अशी कबुलीही शिंदे यांनी दिली.

साडेअकरा लाख झाड लावली जाताहेत

एकनाथ शिंदे म्हणाले, महामार्गच काम अतिशय उत्कृष्ट झालंय. 120 च्या गतीने वाहन चालवून सुद्धा 60 ते 70 च्या गतीने वाहन चालवत असल्याचं वाटत होतं. रस्ता इको फ्रेंडली केल्या जातं असून साडेअकरा लाख झाड लावले जातं आहेत. वर्ध्यात समृद्धी महामार्गाचे 58 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. महामार्गाची लांबी 58 किमी, तर रुंदी 120 मीटर आहे. हा मार्ग सहापदरी आहे. 2 हजार 762 कोटींचा महामार्गावर खर्च झाला. समृद्धी महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 782 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आली. समृद्धी महामार्गामुळे नागरिक मुंबई व नागपूर या महानगरांना जोडला जाणार आहे.

नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना

34 गावांमधून हा महामार्ग

वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील 34 गावांमधून हा महामार्ग गेला. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी 58 किमी, तर रुंदी 120 मीटर असून, सहापदरी हा मार्ग आहे. 5 मोठ्या आणि 27 लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्याकरिता 9 उड्डाणपूल तयार करण्यात आलेत. 34 भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेत. पादचाऱ्यांकरिता 12 भुयारी मार्गांचा समावेश आहे. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. अडीचशे मेगाव्हाट सोलरवर इलेक्ट्रिक सुद्धा जनरेट केली जातं आहे. पूर्णतः पर्यावरण पूरक असा हा महामार्ग आहे. या भागातील वन्यसंपदा जतन करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलंय. जवळपास 76 अंडरपास केले आहेत. आठ ओव्हरपास करण्यात आले असून, त्याला जंगलाचा फील देण्यात येत आहे. समृद्धी महामार्गांवर मध्ये कुठेच टोल नाके नाही. प्रत्येक एक्सिट पॉईंटवर टोल नाके आहेत.

Video Amravati | येवदा ग्रामसभेत राडा; सामाजिक कार्यकर्त्यास मारहाण, नेमकं कारण काय?

Video | कोरोना काळात मुंबई मनपाला लुटलं, Devendra Fadnavis यांचा शिवसेनेवर घणाघात, 24 महिन्यांत 38 मालमत्ता!

Chandrapur | आझाद बगीच्याच्या उद्घाटनावरून गोंधळ; आमदार जोरगेवार-सुधीर मुनगंटीवार आमनेसामने

... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.