Video Devendra Fadnavis : आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या.
वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील कान्होली (Kanholi) येथील महिला आक्रमक झाल्या. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. आम्हाला दोन शब्द लिहून द्या, अशी मागणी महिलांनी केली. आमदार, खासदार असूनही अजून आमचं पुनर्वसन (Rehabilitation) झालेलं नाही. तुम्ही आमचं पुनर्वसन करून द्या. आमचं घर, दार पाण्याखाली डुबलेलं आहे. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी महिला करत होत्या. आम्हाला प्लाट घेऊन आमच्यासाठी घर बांधून द्यावं, असं महिला म्हणत होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे त्यांचं म्हणण ऐकूण घेत होते. त्यानंतर फडणवीस म्हणाले, मी जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात सांगतो आहे. हो पुनर्वसन झालं पाहिजे. मी सांगतो, असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शांत केलं.
पाहा व्हिडीओ
आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले… pic.twitter.com/e1yN3dUP6r
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) July 19, 2022
महिलांना सांगितली आपबिती
पुराने वेढा दिला होता. कान्होलीच्या 400 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. त्या पूरग्रस्तांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीमधून बाहेर आले. त्यानंतर चर्चा करीत होते. महिलांचा आक्रोश होता. जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात सांगत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महिला म्हणाल्या, आम्हाला तसे दोन शब्द लिहून द्या. आमचे लहान-लहान मुलं आहेत. आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या. हिंगणघाट तालुक्यात कानोली ग्रामपंचायतीसमोर बोलत होते. आमच्या गावात शाळेची सोय नाही, गाडीची सोय नाही. प्रशासन काहीच करत नाही, असं वर्षा इटनकर म्हणाल्या.
योग्य ती मदत करण्याचे आश्वासन
देंवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त महिलांशी चर्चा केली. फडणवीस म्हणाले, पाणी खरचं गेलं का, याची माहिती घेऊ. चौकशी करू. त्यानंतर सर्वे करून योग्य ती मदत करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. गेल्यावर्षीही पूरग्रस्तांचा सर्वे झाला होता. परंतु, त्यावेळी मदत मिळाली नाही. यावेळी मदत मिळते काय. पुनर्वसन होतं का, हे पाहावं लागेल.