वर्धा : जिल्ह्याच्या देवळी येथे खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन एप्रिल महिन्यात केले आहे. या स्पर्धेकरिता देवळी येथील स्टेडियममध्ये (Stadium at Deoli) खेळाडू सराव करतात आहेत. विदर्भ केसरी कुस्ती (Vidarbha Kesari Wrestling) स्पर्धेचा सराव करत असलेल्या खेळाडूंना पाहण्यासाठी खासदार रामदास तडस हे स्टेडियमवर गेले होते. त्यावेळी त्यांना सरावात भाग घेण्याचा मोह आवरला नाही. खासदार तडस थेट आखाड्यात उतरले. आणि त्यांनी खेळाडूंना डावपेच शिकवले.
यावेळी उपस्थितांना त्यांच्यामधील कसलेला कुस्तीपटू पाहायला मिळाला. वर्धेचे खासदार रामदास तडस हे स्वतः विदर्भ केसरी राहिलेले आहेत. देवळी येथे एक ते तीन एप्रिल या कालावधीत विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन तडस यांनी केले आहे.
देवळीत खासदार रामदास तडस कुस्तीचे डाव शिकविताना… pic.twitter.com/VzEj4x00Yw
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 5, 2022
खासदार तडस हे कुस्तीच्या आखाड्यात उतरले. त्यांनी एकेका खेळाडूला डावपेच सांगितले. तयारी कशी करायची. डाव कसा मारायचा, याचे प्रशिक्षण दिले. कुठे थांबायचं, दम कसा घ्यायचा. दमखम काय असतो, याची जाणीव खेळाडूंना करून दिली. मी फक्त राजकीय आखाडेच खेळत नाही, तर कुस्तीचे आखाडेसुद्धा खेळतो, हे त्यांनी दाखवून दिले. याच कुस्तीच्या आखाड्यात शिकून ते आता राजकीय डावपेचांचा वापर करत आहेत.