Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime | घरावर दगड का मारतो?, वृद्धाच्या डोक्यात हाणली काठी, वर्ध्यात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

मृतकाचे आरोपीसोबत कोणताही वाद झाला नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती आहे. मात्र आरोपी मारोती क्षीरसागर हा रागीट स्वभावाचा आहे. त्याने कोणतेही कारण नसताना रागाच्या भरात मारहाण केल्याची माहिती आहे.

Wardha Crime | घरावर दगड का मारतो?, वृद्धाच्या डोक्यात हाणली काठी, वर्ध्यात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
वर्ध्यात काठीने मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 2:28 PM

वर्धा : जिल्ह्याच्या अल्लीपूर येथे दवाखान्यातून वृद्ध घरी जात होता. वृद्धाला माझ्या घरावर दगड का मारतो असं म्हणतं वाटेत अडवण्यात आले. काठीचे मारहाण (Strike) करण्यात आली. यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अल्लीपूरच्या विठ्ठल मंदिर वॉर्ड (Vitthal Mandir Ward) परिसरात घडली. सुधाकर कलोडे (70 वर्षे ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रकृती बरी नसल्याने सुधाकर कलोडे (Sudhakar Kalode) हे रविवारी सकाळी दवाखान्यात गेले. दुपारी ते विठ्ठल वॉर्ड परिसरातून परत घरी जात होते. येथेच मागाहून आलेल्या मारोती क्षीरसागर याने सुधाकर यांच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार केला. यात सुधाकर हे गंभीर जखमी झाले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. पण उपचारादरम्यान सुधाकर यांची प्राणज्योत मालवली.

आरोपीस अटक

हाणामारीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुलसिंग पाटील व अल्लीपूरचे ठाणेदार सुनील गाढे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात संध्याकाळी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीस रात्री अटक करण्यात आली आहे. छोट्याशा कारणावरून मारहाण केली. त्यामुळं आरोपीला आता जेलची हवा खावी लागणार आहे.

आरोपी रागीट स्वभावाचा

मृतकाचे आरोपीसोबत कोणताही वाद झाला नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती आहे. मात्र आरोपी मारोती क्षीरसागर हा रागीट स्वभावाचा आहे. त्याने कोणतेही कारण नसताना रागाच्या भरात मारहाण केल्याची माहिती आहे. मारोती क्षीरसागर याने रागाच्या भरात प्रहार केला. विनाकारण म्हाताऱ्या व्यक्तीचा जीव गेला. पण, आता मारोतीवर खडी फोडायची वेळ येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.