धरणग्रस्तांच्या जमिनीसाठीच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचे अश्वासन; दोन दिवसात या धरणग्रस्तांसाठी मुंबईत बैठक

स्थानिक बाजारभावाप्रमाणे रक्कम देणे तसेच सर्वं धरणग्रस्तांचे खाती संकलन करणे, ज्या लोकांना अद्याप उतारे मिळाले नाहीत त्यांना त्वरित जमिनी देणे.

धरणग्रस्तांच्या जमिनीसाठीच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचे अश्वासन; दोन दिवसात या धरणग्रस्तांसाठी मुंबईत बैठक
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 11:46 PM

सांगलीः वारणा धरणग्रस्तांचे गेल्या दोन दिवसांपासून इस्लामपूर तहसील कार्यालयावर आंदोलन सुरू होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन नंतर आता स्थगीत करण्यात आले आहे. उद्यापासून काम दिसले नाही तर 30 तारखेला पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा गौरव नायकवडी यांनी सरकारला दिला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीआर रद्द झाल्याचे सांगून दोन दिवसात मुंबईमध्ये बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

त्यामुळे वारणा धरग्रसतांचे आज तिसऱ्या दिवशी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. इस्लामपूर तहसील कार्यालय परिसरात हजारो धरणग्रस्तांनी सोमवारपासून गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले होते.

धरणग्रस्तांच्या आंदोलनाकडे संबंधित अधिकारी व तहसीलदार, प्रांत अधिकारी धरणग्रस्तांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही या आंदोलनात करण्यात आला होता.

त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काल मंगळवारी तहसील कार्यालयाचे गेट तोडून कार्यालयाचा कब्जा घेतला होता तर या आंदोलनाला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक तसेच अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला होता.

यामुळे अखेर आज जिल्हाधिकारी कार्यलयात यशस्वी बैठक पार पडली. यामध्ये उद्यापासून जमिनी पाहण्याचा पोग्रॅम लावणे तसेच ज्या लोकांना जमिनी नको आहेत.

त्यांना स्थानिक बाजारभावाप्रमाणे रक्कम देणे तसेच सर्वं धरणग्रस्तांचे खाती संकलन करणे, ज्या लोकांना अद्याप उतारे मिळाले नाहीत त्यांना त्वरित जमिनी देणे.

यासारख्या महत्वाच्या विषय मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे वारणा धरण प्रकल्प आणि अभयारण्यग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी जाहीर केले. यावेळी प्रांत अधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते येलूर येथील 55 शेतकऱ्यांना उताऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

तर उद्यापासून गावोगावी जाऊन धरणग्रस्तांचे माहिती घेऊन येत्या 30 तारखेपर्यत आमच्या सर्वं मागण्यांची पूर्तता करा त्यानंतर आम्ही आंदोलन थांबवत नाही आहोत. असे सांगत तात्पुरते स्थगित करतोय असं यावेळी स्पष्ट करण्यात आले. उद्यापासून काम दिसले नाही तर 30 तारखेला पुन्हा येऊन बसणार.’ असा इशारा देत धरणग्रस्तांच्या आंदोलनाला आज तूर्तास विराम देत असल्याचे गौरव नायकवडी यांनी जाहीर केले आहे.

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.