Banjara Poharadevi | बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचं महत्त्व काय?

श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. (Washim Banjara Poharadevi Importance In Sanjay Rathod Matter)

Banjara Poharadevi | बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचं महत्त्व काय?
पोहरादेवी
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 11:39 AM

मुंबई : शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास पोहरादेवीला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी खासगी गाडीत (MH 04 FB 567) बसून राठोड कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan) गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेल्या संजय राठोड यांची पहिली झलक प्रसारमाध्यमांनी टिपली, त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड होत्या. (Washim Banjara Poharadevi Importance In Sanjay Rathod Matter)

बंजारा समाजाची माहिती 

बंजारा समाज खूप वर्षापासून अस्तित्वात आहे. या समाजाचे लोक बंजारा म्हणून ओळखले जातात. या समाजातील लोकांना कामासाठी नेहमी भटकत राहावे लागते. त्यामुळे त्यांना भटक्या जमातीचे लोक असं म्हणूनही ओळखले जाते. बंजारा समाजात लामण, लाम्बाडी, लांबणी अशा अनेक पोटजाती आहेत. महाराष्ट्रात या समाजाचे वास्तव्य जास्त आहे. त्यासोबतच राजस्थान, उत्तर भारत, मारवाड़ क्षेत्र, आंध्रप्रदेश तेलंगाणा या ठिकाणीही या समाजातील लोक आढळतात.

पोहरादेवीचं महत्व 

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संत सेवालाल महाराजांना देशभरातील 12 कोटी जनता मानते.

संपूर्ण देशभरातील 10-12 लाख बंजारा भाविक श्री. राम नवमी यात्रेकरिता या ठिकाणी येतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात. म्हणून बंजारा समाजातील प्रत्येक नागरिकांच्या घराघरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बाबूलाल महाराजांचा फोटो लावून पोहोरादेवीची पूजा करतात.

पोहोरादेवी हे एक धार्मिक स्थळ आहे. धर्मपीठ आहे. येथून आम्ही समाजाला संदेश देतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. चांगल्या रितीरिवाज रुढी परंपरेविषयी प्रथेविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. संपूर्ण 12 कोटी जनतेची पोहरादेवीविषयी हीच भावना असते.  मुस्लिम धर्मातील प्रत्येक नागरिक हजला एकदा दर्शन करायला जातात. तसेच बंजारा समाजातील व्यक्ती एकदा तरी पोहरादेवीला दर्शन करायला येतो.

बंजारा समाजातील महंत परंपरा

जगतगुरु संत सेवालाल महाराजांचे वंशज संत बामनराव महाराज हे आहेत. त्यांचे वंशज सुनील महाराज हे सध्या बंजारा समाजातील प्रसिद्ध महंत आहे. जगतगुरु संत रामराव महाराजांचे वंशज संत बाबूसिंह महाराज आहेत. तर संत कबीरसिंह महाराज, महंत जितेंद्र महाराज हे देखील बंजारा समाजातील श्रद्धास्थान आहे.

पोहारगड संस्थानची भूमिका काय?

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्यावर एक फार मोठा प्रसंग आहे. मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर फार आरोप होत आहेत. म्हणून बंजारा समाजातील काशी जे त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्या काशीचे सर्व महंत काल एकत्र आलो. त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया महंत सुनील राठोड यांनी दिली.

संजय राठोड यांच्यावर नव्हे, तर संपूर्ण बंजारा समाजावर हा प्रसंग आहे. अशावेळी संत सेवालाल महाराजांच्या दर्शनाकरिता ते येतील, त्यावेळी याबाबत त्यांची भूमिका ठरेल.

संजय राठोड हा तरुण तडफदार नेतृत्व समाजात निर्माण होत आहे. बहुजनांचे नेतृत्व संपवण्याचे हे कट कारस्थान आहे. संजय राठोड यांनाही अशाचप्रकारे संपवण्याचा कट आहे. संपूर्ण देशातील बंजारा हा त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत, असेही सुनील राठोड म्हणाले.

बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचं निधन

पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. ऑक्टोबर महिन्यात संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज  यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते दिग्गजांनी रामराव महारांजांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाशिमच्या मालेगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळगावी पोहरादेवी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. संत सेवालाल यांचे वंशज असल्याने रामरावबापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रध्दा होती. इतरही समाजात त्यांना मान होता. (Washim Banjara Poharadevi Importance In Sanjay Rathod Matter)

रामराव महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.

Video : बंजारा समाज म्हणजे कुठला समाज? पोहरादेवी आणि सेवालाल महाराजांचं महत्त्व काय?

 

संबंधित बातम्या : 

देशभरातील बंजारा समाजावर शोककळा, धर्मगुरु संत रामराव महाराजांचे निधन

Sanjay Rathod : राजीनामा देऊन संजय राठोड पोहरादेवीला शरण जाणार?

(Washim Banjara Poharadevi Importance In Sanjay Rathod Matter)

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.