Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनापरवाना कोविड सेंटर चालवणं महागात पडलं, नवजीवन हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई

खासगी रुग्णालयाला कोविड डेडिकेट रुग्णालय चालवण्याची परवानगी नसताना वाशिम शहरातील नवजीवन हॉस्पिलनं 20 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. Washim Corona News

विनापरवाना कोविड सेंटर चालवणं महागात पडलं, नवजीवन हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई
नवजीवन क्रिटीकल केअर
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 7:30 PM

वाशिम: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून,शासकीय रुग्णालयात बेड खाली असताना रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचं चित्र आहे.  खासगी रुग्णालयाला कोविड डेडिकेट रुग्णालय चालवण्याची परवानगी नसताना वाशिम शहरातील नवजीवन हॉस्पिलनं  20 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी आज कारवाई केली. संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर कोविड रुग्ण दवाखान्यात न घेण्याची तंबी देण्यात आली आहे. (Washim District civil surgeon take action against Navjeevan Critical care due to treatment gave to corona patient without permission)

रुग्णालयात कोरोनाचे 20 रुग्ण

वाशिम शहरात नवजीवन हॉस्पिटलमध्ये कोविडचा विनापरवाना नसताना कोरोना रुग्णावर इलाज सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकानं रुग्णलयात पाहणी केली असता कोरोनाचे 20 रुग्ण आढळून आले. त्यामुळं बॉम्बे नर्सिंग अँक्ट नुसार रुग्णालयाचा परवाना रद्द का करू नये, अशी नोटीस देण्यात आली असल्याचे डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. नवजीवन हॉस्पिटलमध्ये निमोनियाचे रुग्ण आहेत. आज जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली. आम्ही कोविड सेंटरची परवानगी घेतली नव्हती. आम्ही आज कोविड सेंटरची परवानगी साठी फाईल पाठविली असल्याचं नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 488 रुग्ण आढळले आहेत तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 262 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 37 दिवसात एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मागील 12 दिवसात 3423 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:19383

सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण :2422

आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण:16749

आतापर्यंत एकूण मृत्यू :211

संबंधित बातम्या:

नितीन गडकरी रेमडेसिव्हीरसाठी मैदानात, सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीशी चर्चा, एका फोनवर 4 हजार इंजेक्शनची सोय

व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन, नागपूरची विदारक स्थिती

(Washim District civil surgeon take action against Navjeevan Critical care due to treatment gave to corona patient without permission)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.