VIDEO | 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या वानराची थरारक सुटका

वाशिम जिल्ह्यातील येडशी येथील पोलीस पाटील गणेश बारड यांच्या शेतातील 30 फूट खोल विहिरीत हे वानर पडलं होतं. (Washim Monkey Rescue Well Video)

VIDEO | 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या वानराची थरारक सुटका
विहिरीत अडकलेल्या वानराची सुटका
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 12:43 PM

वाशिम : वाशिममध्ये 30 फूट खोल पाण्याच्या विहिरीत अडकलेल्या वानराची सुटका करण्यात यश आलं आहे. तीन ते चार दिवसांपासून हे वानर विहिरीत अडकलं होतं. सुटकेनंतर वानराने धूम ठोकली. बचावकार्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Washim Monkey Rescue from Well Video)

वाशिम जिल्ह्यातील येडशी येथील पोलीस पाटील गणेश बारड यांच्या शेतातील 30 फूट खोल विहिरीत हे वानर पडलं होतं. उन्हाळ्यामुळे उष्णता वाढली आहे. त्यातच तहानलेलं वानर पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. या वानराला वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम, वाशिम शाखा वनोजाच्या सदस्यांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षितरित्या वर काढले आणि जीवदान दिले.

वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमची मदत

येडशी येथील गणेश बारड यांच्या शेतातील विहिरीत हे वानर पडलं होतं. हा प्रकार गणेश बारड यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमचे सदस्य आदित्य इंगोले यांना संपर्क केला. यावेळी आदित्य इंगोलेंनी तात्काळ आपले सहकारी सतिष राठोड, हरिष इंगोले, अमर खडसे यांना घटनास्थळी पाठवले.

दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका

त्यानंतर वन विभागाशी संपर्क करुन त्यांच्या आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने वानराची सुटका करण्यात आली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितरित्या बाहेर काढून वानराला जीवदान देण्यात आले. विहिरीबाहेर काढताच त्या वानराने मात्र लांबवर धूम ठोकली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

वीजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू, ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा, आंघोळ घालून अंत्यसंस्कार

VIDEO | जाळीत अडकल्याने पिल्लाची माकडीणीशी ताटातूट, प्राणीमित्राकडून सुटका

(Washim Monkey Rescue from Well Video)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.