कोरोनामुळे पोहरादेवी येथील यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद

कोरोनामुळे यंदाची पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. 18 ते 22 एप्रिल या काळात भाविकांना पोहरादेवी गडावर येता येणार नाहीये. (washim poharadevi yatra cancelled corona patient)

कोरोनामुळे पोहरादेवी येथील यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद
POHARADEVI YATRA
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 10:44 PM

वाशिम : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे राज्याने अनेक निर्बंध जारी केले आहेत. असे असताना वाशिम जिल्ह्यात उमरी खुर्द परिसरात 18 ते 22 एप्रिल या कालावधित भरणारी पोहरादेवी येथील यात्रा (Poharadevi Yatra) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा प्रशासनानेसुद्धा मोठ्या हालचाली केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदाची पोहरादेवी येथील यात्रा रद्द केली आहे. 18 ते 22 एप्रिल या काळात भाविकांना पोहरादेवी गडावर येता येणार नाहीये. तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Washim Poharadevi Yatra has been cancelled due to increase in Corona patient)

5 किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरात पूर्णतः प्रतिबंध

पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान येथे राम नवमी अर्थात 21 एप्रिल 2021 रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार 18 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 या कालावधीत संत सेवालाल महाराज संस्थान, पोहरादेवीच्या चारही दिशांना 5 किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरात पूर्णतः प्रतिबंध घालण्यात आला आहे. या परिसरात नागरिकांना येण्यास मनाई असेल. तसेच या आदेशांचे पालन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोहरादेवी व उमरी खुर्दच्या सीमा बंद

यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी पोहरादेवी येथे हजारोच्या संख्येने लोक जमतात. त्यामुळे येथे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोहरादेवी आणि उमरी खुर्द येथे यात्रेच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भाविकांना सीमाबंदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी संबंधित महंत, महाराज आणि ट्रस्ट यांनी हा आदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा असे आवाहनसुद्धा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : सांगली जिल्ह्यात दिवसभरात 921 नवे कोरोना रुग्ण

कोरोनातही सरकारच्या ‘या’ योजनेनं जनता खूश; 291 रुपये जमा कर अन् मिळवा 12 हजार

Maharashtra Corona Update : राज्यात मृत्यूचं तांडव! दिवसभरात 349 जणांचा मृत्यू, तर 61 हजार 695 नवे रुग्ण

(Washim Poharadevi Yatra has been cancelled due to increase in Corona patient)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.