दसऱ्याला मुंबईत शिंदे गटाचा मेळावा, भावना गवळी म्हणतात, इतके लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार
मुंबईतील बीकेसी मैदानावर 5 तारखेला दसरा मेळावा होणार आहे. ती इतिहासात न होणार सभा राहणार आहे. मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
विठ्ठल देशमुख, वाशिम : दसरा मेळाव्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना शिवाजीपार्क मैदान दिले आहे. यावर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावे. यासाठी आमच्या अगोदर अर्ज केला होता. त्यामुळं शिवाजीपार्क मैदान त्यांना मिळाले आहे. मात्र आमचाही दसरा मेळावा मुंबईतल्या बिकेसीवर होणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज दसरा मेळाव्यात घुमणार आहे. मुंबईमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारला मान्य आहे. राज्यभरातून मुंबई येथील मेळाव्याला 10 लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे खासदार भावना गवळी यांनी सांगितलंय.
वाशीम जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकते. तेव्हा सोयाबीनवर आधारित मोठा प्रकल्प राज्य सरकारने स्वतः उभारावा, असे प्रतिपादन खा. भावना गवळी यांनी केले. वाशिम जिल्ह्यातील मसला पेन येथे बालाजी सहकारी साखर कारखाना गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तो सुरू व्हावा या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढाकार घेत असल्याचे समजते.
नितीन गडकरी यांनी हा कारखाना चालवण्यास घ्यावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे 200 गावांतील ऊस उत्पादक शेतकर्यांना त्याचा फायदा होईल.
अब्दुल सत्तार म्हणाले, आम्ही सरकार सोडून बाहेर गेलो. तेव्हा मुंबईत येऊन दाखवा, असं शिवसेनेनं म्हटलं. तेव्हा शिंदे साहेब म्हणतात ह्या पोकळ धमक्या आहेत. मी ऐकला जातो राज्यपाल यांची भेट घेतो. त्यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. शिवसेना शिंदे साहेबांची आहे. त्यांनाच धनुष्य बाण निशाणी मिळणार आहे.
मुंबईतील बीकेसी मैदानावर 5 तारखेला दसरा मेळावा होणार आहे. ती इतिहासात न होणार सभा राहणार आहे. मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.