शेंडीने गाडी ओढण्याचा अजब प्रकार; अवलीया महाराज यांच्या यात्रोत्सवात काय होतं?

अवलिया महाराजांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून शेंडीने गाडे ओढून आपला नवस फेडतात. आज काळामाथा येथे लाखो भाविक भक्तांनी शेंडीने गाडा ओढून नवस फेडला.

शेंडीने गाडी ओढण्याचा अजब प्रकार; अवलीया महाराज यांच्या यात्रोत्सवात काय होतं?
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 7:03 PM

वाशिम : जिल्ह्यातील काळामाथा येथील नवसाला पावणारा देव अशी परंपरा आहे. प्रसिद्ध असलेल्या संत अवलिया (Awaliya Maharaj) महाराज यांच्या 132 व्या यात्रा महोत्सवाला (Yatra Mahotsav ) सुरुवात झाली आहे. अवलीया महाराज यांच्या दर्शन, महाप्रसाद (Mahaprasad) घेण्यासाठी आणि शेंडीने गाडी ओढली जाते. अवलिया महाराज यांचा नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविक या यात्रेत दाखल झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील काळामाथा येथे पुरातन काळात अवलिया महाराज प्रकट झाले होते. त्यानंतर त्यांनी शेजारील गावातील दत्तू पाटील यांच्या स्वप्नात जाऊन यात्रा महोत्सवाची कल्पना दिली. त्यावेळेसपासून येथे यात्रा सुरू झाली असल्याचं भाविक सांगतात.

वाशिम जिल्ह्यातील काळामाथा येथील अवलिया महाराज हे जागृत देवस्थान आहे. एकमेव यात्रा नवसासाठी प्रसिद्ध आहे. यात्रा महोत्सव दरम्यान 101 क्विंटलच्या शिऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

पुरणपोळीचा नैवैद्य

भाविक येथे नवस बोलतात. नंतर यात्रा महोत्सवात शेंडीने गाडा ओढून नवस फेडतात. तसेच भाविक पुरणपोळीचा नैवेद्य अवलिया चरणी अर्पण करतात. शेकडो वर्षांपासून असलेली गाडी ओढून नवस फेडण्याची परंपरा अजूनही कायम आहे.

आमची बंजारा समाज बांधवांसाठी ही यात्रा महत्त्वाची आहे. आम्ही आधी नवस बोलतो. आमचं मागणं पूर्ण झालं की गाडी ओढून पूर्ण करीत असल्याचे भाविक सांगतात.

लाखो भाविकांची श्रद्धा

दिवसेंदिवस दिवस विज्ञान प्रगती करीत असल्याच चित्र सर्वत्र बघावयास मिळत आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील संत अवलिया महाराज यांच्यावर ठेवलेली श्रद्धा कमी होताना दिसत नाहीय. त्यांच्याकडे भक्तांनी केलेली मागणी पूर्ण होत आहे. आजही लाखो भाविक आपली श्रद्धा टिकवून आहेत.

काळामाथा येथील श्री संत अवलिया महाराज यांची नवसाला पावणारा देव म्हणून पंचक्रोशीत ख्याती आहे. ईच्छापूर्तीसाठी बोललेला नवस फेडण्यासाठी काळामाथा येथील यात्रा महोत्सवादरम्यान लाखो भाविक आपल्या कुटुंबासह काळामाथा येथे येतात.

अवलिया महाराजांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून शेंडीने गाडे ओढून आपला नवस फेडतात. आज काळामाथा येथे लाखो भाविक भक्तांनी शेंडीने गाडा ओढून नवस फेडला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.