युवक बाईकने सुसाट निघाला, महामार्गाच्या 100 फूट फेकला गेला; नेमकं काय घडलं?
कारंजा येथील सास संस्थेच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले. तत्काळ सास संस्थेचे दीपक सोनोने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला वेळीच रुग्णालयात दाखल केले.
वाशिम : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गावरून सुसाट वेगाने एक युवक जात होता. वाई फाट्यानजीक दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले. यावेळी झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला. सोहळ येथील सुनील वारे हा कारंजाकडे जात होता. सुसाट दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने युवक महामार्गाच्या 100 फूट रस्त्याच्या खाली फेकला गेला. पायाला जब्बर दुखापत झाली. एक तास बेशुद्ध अवस्थेत पडून होता. मात्र सदर घटनेची माहिती वनोजा येथील राष्ट्रीय सेवा योजना आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळाली. त्यांनी रुग्णाला तात्काळ कारंजा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नागपूर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गावर वाई फाट्यानजीक हा अपघात झाला. दुचाकीवरून नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सुनील वारे (वय २५ वर्षे) हा जखमी झाला. सोहळ हे शेलुबाजारवरून तो कारंजाकडे जात असताना हा अपघात झाला.
सुसाट दुचाकीवरून नियंत्रण सुटून युवक महामार्गाच्या खाली गेला. घटनेची माहिती श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा राष्ट्रीय सेवा योजना आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य अनिकेत इंगळे यांना मिळाली. ते त्यांचे सहकारी अक्षय भगत व विजय भगत यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले.
युवकाच्या पायाला गंभीर दुखापत
कारंजा येथील सास संस्थेच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले. तत्काळ सास संस्थेचे दीपक सोनोने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला वेळीच रुग्णालयात दाखल केले. यावेळी युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
बेशुद्ध अवस्थेत पडून
अपघात झाल्यावर सुनील बेशुद्ध अवस्थेत ३० मिनिटे पडलेला होता. पण कोणीही त्याला हात लावत नव्हते. रासेयोच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सदर युवकाचे प्राण वाचले.