MLC Election महाविकास आघाडी-भाजपच्या उमेदवारांकडे नाही स्पष्ट बहुमत, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष ठरणार निर्णायक

या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या तीन टर्मपासून गोपिकीशन बाजोरिया यांचे वर्चस्व आहे. गेल्या तिन्ही निवडणुका त्यांनी भाजपा- सेना युतीच्या वतीने लढविल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीकडे भाजपच्या तुलनेत मतदार अधिक होते.

MLC Election महाविकास आघाडी-भाजपच्या उमेदवारांकडे नाही स्पष्ट बहुमत, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष ठरणार निर्णायक
गोपिकीशन बाजोरिया व वसंत खंडेलवाल
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 1:21 PM

अकोला : अकोला – बुलडाणा – वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगणार आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपाच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाहीत. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे त्यांच्या विजयाचा जॅकपॉट ठरणार आहे. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून आता त्यांची मनधरणी केली जात आहे.

822 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

अकोला – बुलडाणा – वाशीम या मतदारसंघात 822 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाविकास आघाडीकडे काँग्रेस 190, शिवसेना 130 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 76 असे एकूण 396 मते आहेत. भाजपाकडे 244 मते आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार आहेत. हे मतदार आपल्या विजयाचा जॅकपॉट बनू शकतात असा समज उमेदवारांना येताच त्यांनी या मतदारांची मनधरणी सुरू केली आहे.

बाजोरिया महाविकास आघाडीकडून रिंगणात

या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या तीन टर्मपासून गोपिकीशन बाजोरिया यांचे वर्चस्व आहे. गेल्या तिन्ही निवडणुका त्यांनी भाजपा- सेना युतीच्या वतीने लढविल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीकडे भाजपच्या तुलनेत मतदार अधिक होते. परंतु अपक्षांसह अन्य पक्षातील मतदारांना ऐनवेळी मॅनेज करण्याचे कसब बाजोरिया यांना चांगलेच अवगत आहे. यावेळी मात्र राज्यातील पक्षीय समीकरण बदलल्याने बाजोरिया हे महाविकास आघाडीकडून या निवडणूक रिंगणात उतरले. यंदा त्यांच्याकडे असलेले संख्याबळ बघता त्यांना मागीलप्रमाणे फार रसद पुरविण्याचे काम नसल्याचे निवडणुकीपूर्वी बोलले जात होते. परंतु भाजपाकडून वसंत खंडेलवाल यांची उमेदवारी जाहीर होताच या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांची मनधरणी

वसंत खंडेलवाल यांचे तिन्ही जिल्ह्यात सामाजिक तथा व्यापारीक असे संबंध आहेत. त्यासोबतच सौम्य व मितभाषी म्हणून त्यांची ओळख आहे. मतदारसंघात फ्रेश चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असले तरी त्यांना या निवडणुकीचाही बराच अनुभव असल्याचे बोलले जात आहे. मतदारांना आपल्याकडे वळविण्याची कला त्यांच्यात आहे. यासोबतच या निवडणुकीत त्यांनी विरोधकाचा विरोधक आपला मित्र हा फार्म्यूला चालविला आहे. त्यामुळं त्यांना पक्षांतर्गत विरोधकांची साथ लाभणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या निवडणुकीत विजयाचा मॅजिक आकडा गाठण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी जॅकपॉट समजल्या जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

बायोडिझेल साठ्यावर पोलिसांची धाड, नांद्यात अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारात हेराफेरी

Maharashtra MLC Election 2021: धुळे-नंदुरबारमध्ये भाजपाचे पारडं जड; महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.