वाशिम जिल्ह्यात पावसाचा कहर; घराची भिंत कोसळून चिमुकला ठार; घरातील इतर व्यक्तीही गंभीर
जांब येथील जानीवाले यांच्या घराची भिंत कोसळून घरातील चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. जानीवाले यांच्या कुटुंबामधीलच आणखी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाशिम: वाशिम जिल्ह्यात (Washim) सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कारंजा तालुक्यातील जांब (Jamb Taluka Karnja)येथे घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू (Baby Death) झाल्याची धक्कादायक दुर्घटना आज घडली. या दुर्घटनेत समर जानीवाले (वय 1 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सेमो जानीवाले वय 65, वर्ष उमेरा जानीवाले (वय 10) युसुफ जानीवाले (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाशिम जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे शेतीच्या नुकसानीसह अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
जांब येथील जानीवाले यांच्या घराची भिंत कोसळून घरातील चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. जानीवाले यांच्या कुटुंबामधीलच आणखी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बालकाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
घराचेही प्रचंड नुकसान
घराचेही प्रचंड नुकसान झाले असून जानीवाले कुंटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतीसह घरांचीही पडझड
सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर येऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे घरांचीही पडझड सुरू असल्याने अनेक नागरिकांना या पावसाचा फटका बसला आहे. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले आहेच पण अनेक घरांची पडझडही झाली आहे. वाशिममधील कारंजा तालुक्यातील जांब येथेही घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा अंत्य झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.