‘आपलं सरकार, लाडकं सरकार’; विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची नवी घोषणा

CM Eknath Shinde in Poharadevi Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवीतील सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी सरकारी योजनांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची गोळाबेरीज लोकांच्या समोर मांडली आहे. वाचा सविस्तर...

'आपलं सरकार, लाडकं सरकार'; विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची नवी घोषणा
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 1:39 PM

विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिममध्ये आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी याठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी सरकारने केलेल्या कामाचा त्यांनी लेखाजोखा मांडला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. महिलांच्या खात्यात तीन टप्प्यातील साडे चार हजार जमा झाले आहेत. कुणी माईचा लाल लाडकी बहिण योजना बंद करू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

‘आपलं सरकार, लाडकं सरकार’

लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. आमच्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. विरोधक म्हणतात की आम्ही ही योजना बंद करू. पण आज मी इथं सांगू इच्छितो की कुणीही ही योजना बंद करू शकत नाही. आमचं सरकार सर्व वर्गातील लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे. त्यामुळे ‘आपलं सरकार, लाडकं सरकार’ झालेलं आहे, असं शिंदेंनी म्हटलं.

‘बंजारा विरासत’ बद्दल मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

आजच्या या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आला आहे. ‘बंजारा विरासत’चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, असा हा दिवस आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं. यात बंजारा समाजाचा इतिहास आणि परंपरा दाखवण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की आदरणीय पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं. पण तो इतर कुणाच्या नशिबात योग आला नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नशिबात तो योग होता. मोदीजी इथं आले आणि त्यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं, असं एकनाथ शिंदेंनी पोहरादेवीतील भाषणावेळी म्हटलं.

संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला जगण्याचा अधिकार दिला. बंजारा समाजाने त्यांची संस्कृती, त्यांची वेशभूषा आजही सांभाळलेली आहे. या समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे. किड्या मुंग्यांचं रक्षण करा. पर्यावरणाचं रक्षण करा. कोणताही भेदभाव करू नका, असं बंजारा समाज सांगतो, असं शिंदेंनी यावेळी सांगितलं.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.