वाशिम जिल्ह्यातील शहीद जवानाला अखेरचा सलाम; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

सोनखासमध्ये पार्थिव आल्यानंतर अमोल गोरे अमर रहेच्या घोषणांना गाव दुमदूमून गेले होते. तर त्यानंतर अमर रहे अमर रहेच्या घोषणा देत अमोर गोरे त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

वाशिम जिल्ह्यातील शहीद जवानाला अखेरचा सलाम; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 7:49 PM

वाशिम : भारत-चीन सीमेवर देशसेवा करत असताना वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील पॅरा कमांडर अमोल गोरे काल शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून आज त्यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी सोनखास येथे येणार असल्याचे सांगितले होते.भारत-चीन सीमेवर बचाव देशसेवा करताना बर्फचा कडा कोसळून त्याखाली ते दबले गेले होते, त्यानंतर तात्काळ मदतकार्य करून त्यांना बाहेर काढण्यात आले होते.

भारत-चीन सीमेवर काल शहीद झाल्यानंतर त्यांचे पार्थिव आज शहरात दाखल झाले. अमोल गोरे यांचे पार्थिव गावामध्ये आल्यानंतर सगळ्या गावावर शोककळा पसरली. अमोर गोरे यांचे पार्थिव दिसताच, कुटुंबीयांनी फोडलेला हंबरड्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले.

त्यानंतर शहीद अमोल गोरे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी शहरात हजारोच्या संख्येनं नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सोनखास या त्यांच्या मूळगावी शहीद अमोल गोरे यांना भारतीय सैन्याच्या तुकडीने बंदुकीच्या 7 फैरी झाडत मानवंदना देऊन त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी अमोल गोरे यांच्या मयूर गोरे या 2 वर्षाच्या मुलानं मुखाग्नी दिला.

अमोल गोरे शहीद झाल्याचे समजताच काल पासून गावावर शोककळा पसरली होती. तर जवान अमोल गोरे यांचे कुटुंबीय दुःखसागरात बुडाले होते.

सोनखासमध्ये पार्थिव आल्यानंतर अमोल गोरे अमर रहेच्या घोषणांना गाव दुमदूमून गेले होते. तर त्यानंतर अमर रहे अमर रहेच्या घोषणा देत अमोर गोरे त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने साहाय्यक जिल्हाधिकारी मीनू पी. एम., उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी अमोल गोरे यांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अखरेची मानवंदना दिली.

तर शहीद अमोल गोरे यांचे आई-वडील व पत्नी वैशाली गोरे यांच्याकडूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.भारतीय सैन्य दलाचे हर्जिंदर कुमार यांच्या नेतृत्वाखाली गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.

शहीद अमोल गोरे यांना श्रध्दांजली म्हणून शहरांतील व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठानं स्वयंस्फूर्तिनं बंद ठेवून अंत्ययात्रेवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला.

अंत्यविधी सोहळ्याला वाशीम जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक,अर्ध सैनिक बल यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील सुमारे 25 हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.