Video Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी, वाशिम जिल्ह्यातून सुरुवात; ताशी 120 किमी धावणार वाहने

नागपूर ते सेलूबाजार हा टप्पा पूर्ण होतोय. पहिला टप्पा आहे, हा खुला केला जातोय. फेसवाईज रस्ते बनवले जातील. नागपूर-मुंबईची डेडलाईन डिसेंबर 2023 ही आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने ह्याला डिजाईन केलंय. वाकडी तिकडी वळणं नाहीयेत. ताशी 120 किमी वेगाने जाऊ शकतो.

Video Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी, वाशिम जिल्ह्यातून सुरुवात; ताशी 120 किमी धावणार वाहने
समृद्धी महामार्गाची पाहणी करताना एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:23 PM

वाशिम : एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway) करताना अॅडवान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. सोलार एनर्जी जनरेट करतोय. या मार्गाची हवाई पाहणी केलीये. भिवंडीपासून सेलूबाजार पर्यंतचा रस्ता पाहिला. वाईल्ड लाईफसाठी (Wildlife) काळजी घेतलीय. वन्य जीवांसाठी जंगलाचा फिल यावा अशी व्यवस्था केलीय. वाईल्ड लाईफसाठी 125 कोटी रुपये खर्च केलेत. ज्यांना मोबदला दिला त्यांनी गाड्या, दुकाने, घरं घेतली. त्यावर समृद्धी लिहीलंय. मुंबई-नागपूर हे अंतर आधी 16 तासांचं होतं. ते अंतर आता 8 तासांवर येणार आहे. शिवमडका (Shivamadka) इथं औद्योगिक कंपन्या येऊ लागल्या आहेत. लॅंड पूलींगमध्ये त्यांना फायदा दिला जातोय. अप्रतिम इंटरचेंजचं काम झालंय. कोविडचं संकट असतानाही काम झालंय, याचं एक समाधान आहे. विशेष आनंद आहे की तेव्हाही मी मंत्री होतो. आताही आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांना निमंत्रण असेल. नागपूर ते सेलूबाजार हा टप्पा पूर्ण होतोय, पहिला टप्पा आहे, हा खुला केला जातोय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

असा राहणार टोलचा खर्च

समृद्धी महामार्गावर कार, जीप, व्हॅन किंवा हलकी मोटार वाहने यांच्यासाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये प्रमाणे टोल द्यावा लागेल. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने किंवा मिनी बस यांना 2.79 रुपये खर्च येईल. बस अथवा ट्रक (दोन आसांची) यांच्यासाठी 5.85, तीन आसांची व्यावसायिक वाहने यांच्यासाठी 6.38 रुपये, अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम) किंवा अनेक आसांची वाहने (एमएव्ही-चार किंवा सहा आसांची) 9.18 तर अतिजड वाहनांसाठी (सात किंवा जास्त आसांच्या वाहनांसाठी 11.17 रुपये प्रतिकिलोमीटर टोल द्यावा लागेल.

यांच्या वाहनांना राहणार सूट

समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर यांना मनाई राहणार आहे. तसेच या मार्गावर 26 प्रकारच्या व्यक्तींच्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. यात देशातील महत्त्वाची पदे सोबत न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, लोकसभा-राज्यसभा खासदार, विधानसभा-विधानपरिषद सदस्य, राज्याचे मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कराची वाहने, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेना दलाच्या निमलष्करी दलासह आणि पोलिस विभागाची वाहने, पोस्ट विभागाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका-शववाहिका यांचा समावेश आहे.

Video Nagpur | समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्ह; पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच

Video Samrudhi Highway | समृद्धी महामार्गाची एकनाथ शिंदे आज पाहणी करणार, 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Video Sanjay Raut | नागपुरात पुढचा महापौर शिवसेनेचा असेल, संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांमध्ये फुंकले प्राण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.