Washim : बाईकची समोरासमोर धडक, मागून येणाऱ्या ट्रकने रस्त्यावर पडलेल्या तरुणाला चिरडलं! जागीच मृत्यू

Washim Accident : नेमक्या त्याच क्षणी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकला वेग आवरता आला नाही आणि ज्याची भीती होती, नेमकं तेच घडलं.

Washim : बाईकची समोरासमोर धडक, मागून येणाऱ्या ट्रकने रस्त्यावर पडलेल्या तरुणाला चिरडलं! जागीच मृत्यू
वाशिमधील दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 1:57 PM

वाशिम : वाशिमच्या (Washim News) मानोरा तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन दुचाकी समोरसमोर धडकल्या. या अपघातात (Washim Accident) रस्त्यावर कोसळलेल्या दुचाकीस्वार तरुणावरुन मागून येणार ट्रक धडधडत गेला. यात तरुणाच्या शरिरांच्या चिंधड्या उडाल्यात. ट्रकने चिरडल्यामुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जणखी झालाय. गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातात (Major Road Accident) तरुणानं जीव गमावल्यामुळे मानोरा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आकाश राठोड असं अपघात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. सिंगद ते सोमनगर रोडवर हा भीषण अपघात घडला. वाशिमच्या मानोऱ्यात दिवसभरात घडलेली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसात वाशिमच्याच मानोरा तालुक्यात एका गावात झाड कोसळून एका पाच वर्षांच्या मुलाचा जीव गेला होता. तर या घटनेत दोघेजण जखमी झाले होते.

नेमकं काय घडलं?

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सिंगर ते सोमनगर रोडवरुन विचित्र अपघात घडला. दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेतनंतर आकाश राठोड हा तरुण रस्त्यावर खाली पडला.

..आणि ट्रकने चिरडलं

दरम्यान, नेमक्या त्याच क्षणी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकला वेग आवरता आला नाही आणि ज्याची भीती होती, नेमकं तेच घडलं. भरधाव ट्रकच्या चाकाखाली आकाश राठोड हा तरुण सापडला. भरधाव ट्रक आकाशच्या शरीरावरुन धडधडत गेला आणि त्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातातील आणखी एक जण गंभीर जखमी झाला. सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : भंडाऱ्यातही ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

अपघातांचं सत्र..

शनिवार हा अपघातवार ठरलाय. वेगवेगळ्या अपघातांची मालिका शनिवारी पाहायला मिळाली. शनिवारी वाशिमसोबत नाशिक-औरंगाबाद मार्गावरही अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुसरीकडे धारवाडमध्ये क्रूझरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 8 जणांचा जीव गेलाय. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच चंद्रपुरातही ट्रकची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तब्बल 9 जण जिवंत जळाले होते. या घटनेनंतर राज्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचं चित्र बघायला मिळतंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.