Washim Theft : चोरट्यांनी महिलेला पुजेसाठी मंदिरात नेले अन् गळ्यातील पोत घेऊन पसार झाले; वाशिममध्ये पिंपरी सरहद्द येथील घटना
मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी पूजेच्या बहाण्याने मंदिरात नेऊन सुमन यांच्या गळ्यातील पोत घेऊन पसार झाले. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
वाशिम : समोरील मंदिरात पूजा करायची आहे, आमच्यासोबत चला असे सांगून महिलेला नेले अन् तिच्या गळ्यातील पोत घेऊन चोरटे (Thief) पसार झाल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. सुमन हजारे (Suman Hazare) असे लुटण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सुमन या आपल्या नातीसोबत दुपारी शेतावर पतीला जेवणाचा डबा घेऊन गेल्या होत्या. डबा देऊन घरी परतत असतानाच मेहकर मालेगाव या महामार्गावर ही घटना घडली. मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी पूजेच्या बहाण्याने मंदिरात नेऊन सुमन यांच्या गळ्यातील पोत घेऊन पसार झाले. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (In Washim, a woman’s mangalsutra was stolen under the pretext of worship)
शेतावरुन घरी परतत असताना घडली घटना
सुमन हजारे यांच्या मालकिची मेहकर मालेगाव या राष्ट्रीय महामार्गालगत पाच एकर जमीन असून याच शेतामध्ये पॉलीहाऊस आहे. येथे पती रामचंद्र हजारे यांचा जेवणाचा डबा घेऊन सुमन गेल्या होत्या. डबा देऊन नातीसोबत परत घराच्या दिशेने येत असताना मेहकर मालेगाव या महामार्गावर दोन चोरटे मोटारसायकलवरुन उतरुन त्यांच्याजवळ आले. मावशी समोरील शेतात आसरा मातेचे मंदिर आहे. आम्हाला पूजा करायची तुम्ही आमच्याबरोबर चला, असे चोरट्यांनी सुमन यांना सांगितले. चोरटे मोटारसायकल घेऊन मंदिराकडे निघाले. सुमनही त्यांच्या पाठीमागून मदिरात गेल्या.
चोरट्यांनी हातचलाखी करत पोत चोरली
मंदिरात पोहचल्यानंतर चोरट्यांनी 500 रुपयांच्या चार नोटा काढून एकूण दोन हजार रुपये काढले आणि पैशाला सोने लावायचे आहे असे सांगून सुमन यांची पोत मागितली. सुमन यांनी गळ्यातील पोत काढून दिली. चोरट्यांनी त्या पोतेला ते दोन हजार रुपये गुंडाळन पूजा केली. नंतर हातातील पिशवीतत ती पोत व पैसे टाकत मावशी हे दोन हजार रुपये गरीबांना वाटून द्या असे म्हणत चोरटे पसार झाले. चोरटे गेल्यानंतर पिशवीत पाहिल्यानंतर त्यातील पोत गायब होती. अशा प्रकारची दुसरी घटना या परिसरात घडली असून या भुरट्या चोरांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान आहे. (In Washim, a woman’s mangalsutra was stolen under the pretext of worship)
इतर बातम्या
नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा