पापड उद्योगातून तिने महिलांना मिळवून दिला रोजगार; वाशिमच्या विमल राजगुरू यांची उंच भरारी

या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज काढले. त्या पैशातून वाशिम येथे तृप्ती पापड उद्योग सुरू केला.

पापड उद्योगातून तिने महिलांना मिळवून दिला रोजगार; वाशिमच्या विमल राजगुरू यांची उंच भरारी
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 6:27 PM

विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : शिकलेली आई घरा दाराला पुढे नेई, हे प्रेरक घोषवाक्य साध्य झाल्याचा प्रत्यय वाशिममध्ये आला. वाशिम येथील तृप्ती पापड उद्योग समुहाच्या संचालक असलेल्या विमलताई राजगुरू यांच्या पापड उद्योगाने उंच भरारी घेतली. गावात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे कुठलेही साधन नव्हते. घरखर्च भागावा म्हणून त्यांनी प्रारंभी टेलरींग व्यवसाय सुरू केला. कालंतराने टेलरिंग व्यवसायातून बचत केलेल्या पैशामधून दळणाची गिरणी खरेदी केली. गावातच ब्रम्हपुत्रा बचत गटाची स्थापना केली.

चार लाखांचे कर्ज काढले

आपणही उद्योग करावा, उद्योग क्षेत्रात नाव कमावावं ही त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कालांतराने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेचा लाभ घेतला. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज काढले. त्या पैशातून वाशिम येथे तृप्ती पापड उद्योग सुरू केला.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून सुरू केलेल्या पापड उद्योगातून विमलताईंनी कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली. शिवाय इतरही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची जोड

घरगुती अन्न पदार्थांपासून बनविण्यात येणारे पापड, कुरवड्या, शेवया, खारोड्या इत्यादी खमंग खाद्य पदार्थांना ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. नेमकी हीच गरज ओळखून विमलताई राजगुरू यांनी आपल्या गृहउद्योगाला प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची जोड देऊन भांडवल खरेदी केले.

विमलताई राजगुरू यांच्या तृप्ती पापड उद्योगातून बनवलेल्या खाद्य पदार्थांना स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेतही प्रचंड मागणी वाढली आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले त्यांचे पती दत्तात्रेय राजगुरू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील या व्यवसायात त्यांना हातभार लावत आहेत.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

आज घडीला तृप्ती पापड उद्योग केंद्राने वाशिम जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले. गुणवत्तापूर्ण उत्पादन दिल्यामुळे अल्पावधीतच तृप्ती पापड उद्योगाच्या अनेक उत्पादनांना जिल्हाभरातून मागणी वाढली आहे. खर्च वजा जाता महिन्याला ५० ते ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळत आहे.

विमलताईंच्या गृह उद्योगातील यशस्वी वाटचालीबद्दल त्यांना २०१७ चा नारीशक्ती सन्मान, विविध राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये अनेक सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच त्यांच्या गृह उद्योगाचे रूपांतर साळूनंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनीमध्ये झाले आहे.

शिक्षण, राजकारण, समाजकारण वा उद्योग विकासाच्या प्रत्येकच क्षेत्रात आजची महिला अग्रेसर होताना आपण पाहत आहोत. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेच्या आधारामुळे विमलताईंनी घर आणि सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून प्रबळ महत्त्वाकांक्षेच्या बळावर उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

आगामी काळात किमान १०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. उद्योगातील आपल्या यशाचे श्रेय त्यांनी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेला दिले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.