Monsoon: वाशिम जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी
22 जूनपासून जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतकरी आणि सामान्या जनता पावसाची वाट बघतायत. 9 जूनला झालेल्या पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा कायम असताना. 9 जून रोजी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. पावसाच्या आगमानाने सर्वांनाच आनंद झाला आहे. उकाड्यापासून सुटका झाली आहे.जिल्ह्यात काही भागात आज 9 जून रोजी हलक्याशा पावसाला सुरुवात झालेली आहे.आज पडलेला पाऊस हा वळवाचा असून मान्सूनच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. राज्यात मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
13 जून रोजी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 13 जून रोजी हलकासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.22 जूनपासून जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या संदेशानुसार 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडून जमिनीतील ओल चार ते सहा इंच खोल जाणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी पेरणी करण्यापूर्वी पुरेसा पाऊस पडल्यानंतर जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी.
शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये
जमिनीत ओलावा नसतांना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्यांचे अंकुरण होणार नाही व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जाईल व आर्थिक नुकसान होईल.त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. धूळ वाफ पेरणी कापूस या पिकाची काही शेतकरी पेरणी करीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकाची धूळ वाफ पेरणी करू नये. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल चार ते सहा इंच खोल जमीन ओली झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
जिलह्यात मान्सूनचे आगमन 22 जूनपासून
22 जूनपासून जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतकरी आणि सामान्या जनता पावसाची वाट बघतायत. 9 जूनला झालेल्या पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे.