“हे सरकार आल्यापासून दोन महिने टिकणार, तीन महिने टिकणार”; विरोधकांच्या वल्गनाना ‘या’ आमदाराने दिले उत्तर

पोहरादेवी येथील सर्वच पिठाच्या विकासकामाला निधी दिला असल्याचं संजय राठोड यांनी सांगितले आहे. त्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी साऱ्यांना रामनवमीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

हे सरकार आल्यापासून दोन महिने टिकणार, तीन महिने टिकणार; विरोधकांच्या वल्गनाना 'या' आमदाराने दिले उत्तर
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 3:10 PM

वाशिम : महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार व्हावे लागल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वारंवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे सरकार आणि महाविकास आघाडीतील पक्षाकडून पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळेल अशी शक्यता आता पुन्हा एकदा माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संजय राठोड यांनी जोरदार प्रत्युत्तर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जंयत पाटील यांनी सांगितले होते की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार आह. त्यावर आता शिवसेनेतील नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी सडेतोड त्यावर उत्तर दिलं आहे.

त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, हे सरकार सत्तेत आल्यापासून दोन महिने टिकणार नाही, तीन महिने टिकणार नाही,अशा प्रकारची वल्गना विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.

मात्र हे सरकार पूर्ण कार्यकाळ टिकणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. संजय राठोड यांनी वाशिमच्या पोहरादेवीमध्ये रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

आज संजय राठोड यांनी पोहरादेवी येथील महंतांचे दर्शन घेतले. पोहरादेवी येथील सर्व धार्मिक संस्थांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संजय राठोड यांनी विकास कामासाठी 593 कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे.

मात्र महंत सुनील महाराज यांच्या संत बाबनलाल महाराजांच्या पिठाला विकास कामाला डावलून निधी उपलब्ध करून न दिल्याने पक्षपात केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी सुनील महाराज यांनी केला होता,

मात्र पोहरादेवी येथील सर्वच पिठाच्या विकासकामाला निधी दिला असल्याचं संजय राठोड यांनी सांगितले आहे. त्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी साऱ्यांना रामनवमीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

रामनवमीदिवशीच आमदार संजय राठोड यांनी ठाकरे गटावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे सांगत सरकारविषयी विश्वासही त्यांनी दाखवून दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.