Video Washim : बैलजोड्यांच्या किमती वाढल्या, ट्रॅक्टरची मशागत परवडेना; मग काय राव घोड्यांनाच जुंपले…

वाशिममधील एका शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग केलाय. आवड म्हणून घोडे पोसले. जमीन करण्यासाठी बैल नव्हते. ट्रॅक्टरचे भाडे इंधन दरवाढीने वाढले. मग, त्यानं या घोड्यांना प्रशिक्षण दिलं. ते आता शेतीच्या कामात येत आहेत.

Video Washim : बैलजोड्यांच्या किमती वाढल्या, ट्रॅक्टरची मशागत परवडेना; मग काय राव घोड्यांनाच जुंपले...
बैलजोड्यांच्या किमती वाढल्याने शेतात नांगरणीसाठी चक्क घोड्यांनाच जुंपलेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:10 AM

वाशिम : शेतीच्या मशागतीसाठी बैल जोडीची कमतरता आणि ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले. यामुळं वाशीम तालुक्यातील शेलगाव (Shelgaon in Washim taluka) येथील भाऊराव धनगर (Bhaurao Dhangar) या शेतकऱ्याने चक्क घोड्यालाच औताला जुंपले. उन्हाळयात शेताची वखरणीचे काम घोड्याच्या साह्याने केले जात आहे. विशेष म्हणजे याच घोड्यावरून शेतात ये-जा आणि किरकोळ शेती साहित्याची वाहतूक हा शेतकरी करतो. वखरणी, उन्हाळी, सोयाबीन आणि भुइमूंग पिकाच्या कोळपणीसाठीही बैलांपेक्षा दुप्पट गतीने हे घोडे काम करत आहेत. बैलजोडी घेणे परवडत नाही. त्यामुळे केवळ शौक म्हणून पाळलेल्या घोड्यांना काहीतरी काम असावं. म्हणून भाऊराव धनगर यांनी आपल्या राजा आणि तुळशिराम नावाच्या घोड्यांना प्रशिक्षण (training for horses) देणे सुरू केले. बैलांप्रमाणेच हे घोडे शेतकऱ्याला प्रतिसाद देतात. शेतातील मशागतीचे काम जलद गतीने करीत आहेत.

घोडा सक्रिय राहिल्यास आरोग्य उत्तम

वाशिममधील एका शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग केलाय. आवड म्हणून घोडे पोसले. जमीन करण्यासाठी बैल नव्हते. ट्रॅक्टरचे भाडे इंधन दरवाढीने वाढले. मग, त्यानं या घोड्यांना प्रशिक्षण दिलं. ते आता शेतीच्या कामात येत आहेत. घोडा हा पाळीव प्राणी कामात सक्रिय राहल्यास त्याचे आरोग्य उत्तम राहते. असं जुने लोक सांगतात. देशातील डोंगराळ भागात शेती आणि तत्सम कामासाठी तेथील शेतकरी घोड्याचा किंवा खेचराचा वापर करतात. नेमकी हीच बाब हेरून वाशिम जिल्ह्यातील या शेतकऱ्याने घोड्यावर शेती करण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

पाहा व्हिडीओ

जलद गतीने होतात कामे

दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि संकल्पना उदयास येत आहेत. बैलजोडीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही काही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बैल मिळत नाहीत. ट्रॅक्टरचे भाव परवडत नाहीत. त्यामुळं भाऊराव धनगर यांनी पाळलेल्या घोड्यांना थेट औताला जुंपले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात शेतीचे काम घोडे जलद गतीने नक्कीच करू लागतीलं, असं मत अर्जुन नागरे या शेतकऱ्यानं व्यक्त केलंय.

Video Nagpur | इंदिरा गांधी रुग्णालयात सापडला मसन्याऊद; प्राण्याला पाहून रुग्णांमध्ये भीती, नागपूर वनविभागाच्या दिले ताब्यात

Nagpur Crime | 17 वर्षीय मुलगी पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात!

Nagpur Election | शिवसेना, राष्ट्रवादीची युती होणार का? सत्तेसाठी कॉंग्रेसचा लागणार कस

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.