Video Washim Fire | वाशिममध्ये तीन घरांची राखरांगोळी, होते नव्हते ते सारे जळाले, तीन कुटुंब उघड्यावर!

वाशिमच्या मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरातील महमुदिया कॉलोनीमध्ये आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत 3 घरं जळाली. घरांची राखरांगोळी झाल्यामुळे 3 गरीब मुस्लिम परिवार उघड्यावर आले आहेत.

Video Washim Fire | वाशिममध्ये तीन घरांची राखरांगोळी, होते नव्हते ते सारे जळाले, तीन कुटुंब उघड्यावर!
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील लागलेल्या आगीत तीन घरं जळून खाक झालीत. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 7:37 PM

वाशिम : मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरातील महमुदिया कॉलोनी (Mahmudia Colony) येथील अताउल्ला खान हिदायत खान यांच्या घराला आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. भयंकर उष्णतेमुळे आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केले. शेजारच्या सलीम खान शेरखान खान व शाहिदा बी नूर खान या दोघांच्या घरांना ही कवेत घेतले. आगीच्या भीषणतेमुळं घरातील कोणतीही वस्तू वाचविणे शक्य झाले नाही. सलीम खानच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरच्या आगीमुळे स्फोट झाला. त्यावेळी तिन्ही घरातील टीन पत्रे हवेत उडाली. मालेगाव नगरपंचायतची (Malegaon Nagar Panchayat) 1000 लिटर क्षमतेची फायर ब्रिगेड आग विझवण्यात पुन्हा एकदा अयशस्वी ठरली. वाशिम नगर परिषद (Washim Nagar Parishad) येथील फायर ब्रिगेडने आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत तीनही घरांची राख झाली होती. रमजान महिन्यात येणाऱ्या पवित्र सणाच्या पूर्वी 3 गरीब मुस्लिम परिवारांना आपले सर्वस्व गमावून उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. हे तीनही परिवार मजुरी करून आपला चरितार्थ चालवितात. या आगीत अपंग असलेल्या अताउल्ला खानचे जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नुकसानग्रस्तांना मदतीची गरज

शाहिदा बी नूर खान यांचे 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचप्रमाणे सलीम खान शेरखान यांनी कालच रात्री खुललेल्या भीसीची रोख रक्कमही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यांचे जवळपास 2 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन रमजान ईद समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर तीनही गरीब मुस्लिम परिवारांवर या अग्नीतांडवामुळे आर्थिक संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. अशा कठीण प्रसंगी सदर परिवारांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे.

पाहा व्हिडीओ

अग्निशमन गाडी ठरली फेल

मालेगाव नगरपंचायतच्या अग्निशमन गाडीचा घोटाळा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. त्या गाडीने साधी आगपण आटोक्यात येत नाही. त्यावेळी सर्व नगर पंचायत सदस्य असताना निधी असताना एवढी लहान गाडीला या सदस्यांनी का मंजुरी दिली ही आज शहारात चर्चा होती.

Nagpur Yuva Sena | नागपुरात वरुण सरदेसाईंनी फुंकले युवा सेनेत प्राण, विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचं दिलं टार्गेट

Nagpur Petrol | 50 रुपयांपेक्षा कमी पेट्रोल मिळणार नाही! नागपुरातील पेट्रोल पंपावर लागल्या पाट्या

Photo Amravati accident | अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; 1 ठार, 24 जखमी, 6 गंभीर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.