झाड कोसळून 5 वर्षांच्या मुलावर काळाचा घाला! वाशिममधील हृदयद्रावक घटना, दोघे जण जखमी

वाशिममध्ये रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला. वाशिमच्या मानोरा तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं.

झाड कोसळून 5 वर्षांच्या मुलावर काळाचा घाला! वाशिममधील हृदयद्रावक घटना, दोघे जण जखमी
चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 9:13 AM

वाशिम : बिहारमध्ये वीज कोसळून तब्बल 33 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वाशिमधून (Washim News) हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाशिम तालुक्यात झाड पडून एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला आणि पुरुष गंभीर जखणी झाले आहेत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारात ही घटना घडली. वाशिममध्ये जोरदार (Washim rain Update) पाऊस झाला. मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसात मानोरा तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. पहाटेच्या सुमारास मानोरा तालुक्यामधील शेंदोण इथं वादळात झाड पडून धनाजी सातपुते हा अवघ्या पाच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला. या घटनेनं संपूर्ण मानोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. तर अन्य दोघं जण गंभीर जखमी झाले आहे. वाशिम जिल्ह्यात शुक्रवारपासूनच मान्सूनपूर्व पावसानं (Pre-Monsoon Rain in Maharashtra) हजेरी लावली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं वाशिममध्ये मुसळधार पाऊस झाला.

रात्री पावसाचा जोर वाढला…

वाशिममध्ये रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला. वाशिमच्या मानोरा तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी उकाड्यानं हैराण झालेल्यांना एकीकडे दिला दिला. मात्र मानोऱ्याच्या शेंदोणामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे.

पाहा महत्त्वाची बातमी : नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?

हे सुद्धा वाचा

काळजी घेण्याचं आवाहन

मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. सांगलीतही अतिवृष्टीनं पूल पाण्याखाली गेला होता. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचं आणि सतर्कता बाळगण्याचंही आवाहन केलं जातंय.

बिहारमध्ये 33 जणांचा वीज कोसळून मृत्यू

दरम्यान, बिहारमध्ये वाशिममध्ये 33 जणांचा वीस कोसळून मृत्यू झालाय. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याची हजेरी लावकर बिहारमध्ये मुसळधार पाऊस झालाय. बिहारच्या 16 जिल्ह्यांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 33 जणांचा बळी गेला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.