Washim Crime | 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला वाहन परवाना!, वाशिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील प्रकार

सय्यद हुसैन सय्यद अब्दुला या व्यक्तीचा मृत्यू होऊन 10 वर्ष झाले. फेटनेस सर्टिफिकेटवर गजानन हार्ट केअरचे डॉक्टर सचिन पवार त्यांची स्वाक्षरी आहे. मृत व्यक्तीला फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरवर कारवाई का नाही, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Washim Crime | 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला वाहन परवाना!, वाशिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील प्रकार
10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा वाहन परवानाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 4:17 PM

वाशिम : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (Sub-Regional Transport Officer’s Office) नेहमीच काही न काही कारणामुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी एक आश्चर्य करणारी बाब समोर आली आहे. कारण विषय थोर्ड हटके आहे. एका 10 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा लायसन्स तयार करून देण्यात आलंय. हे काम वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये केल गेलं आहे. मात्र हे काम अवैधरीत्या झालं असल्याचं एक जागरूक नागरिकाच्या निदर्शनास येताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एकच खळबळ माजली. ज्या अधिकाऱ्यांने लायसन्स (License by officers) निर्गमित केलं होतं त्याच अधिकाऱ्यांला फिर्यादी बनवण्यात आले. तक्रार देणाऱ्या जागरूक नागरिकालाच आरोपी करण्यात आले. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल (Crime filed) करण्यात आले.

परवाना देताना शहानिशा नाही

वाशिम शहरातील सय्यद हुसैन सय्यद अब्दुला या व्यक्तीचा 4 डिसेंबर 2012 रोजी मृत्यू झाला. मात्र ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही परिवहन कार्यालयातील सहायक मोटर वाहन निरीक्षक सतीश इंगळे यांना आर्थिक लाभ मिळाला. त्यामुळं मृत झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी एका दुसऱ्या व्यक्तीला बसवून जाणीवपूर्वक कोणतीही शहानिशा करण्यात आली नाही. 24 जानेवारी 2022 रोजी तब्बल 10 वर्षांनंतर लायसन्स निर्गमित करून देण्यात आली.

तक्रारदारालाच केले आरोपी

ही बाब त्याच दिवशी काही कामानिमित्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये आलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आली. ते कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले. संपूर्ण कार्यालयात एकच खळबळ उडाली. हे प्रकरण संबंधित अधिकारी इंगळे यांच्यावर आल्यास त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. हे समजताच त्यांनी त्या व्यक्तीची तक्रार न घेता संबंधित अधिकारी इंगळे यांनाच वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी केले. त्या एका व्यक्तीला आरोपी करून त्याच्यावर विविध कलमाअन्वये गुन्हे दाखल करायला लावले.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरनेही फिटनेस सर्टिफिकेट कसे दिले?

सय्यद हुसैन सय्यद अब्दुला या व्यक्तीचा मृत्यू होऊन 10 वर्ष झाले. फेटनेस सर्टिफिकेटवर गजानन हार्ट केअरचे डॉक्टर सचिन पवार त्यांची स्वाक्षरी आहे. मृत व्यक्तीला फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरवर कारवाई का नाही, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. यावरून हे सिद्ध झाला आहे की उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून तर डॉक्टरपर्यंत एक मोठी साखळी आहे. हीच साखळी कुठं तरी थांबली पाहिजे. मृत व्यक्तीच्या नावाने अवैधरीत्या फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टर सचिन पवार यांच्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई करायला पाहिजे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.