Washim | शालेय पोषण आहारात अळ्या, उंदराच्या लेंड्या, वाशिम जिल्ह्यात बालकांच्या जीवाशी खेळ, शिक्षण विभाग गप्प का?

वाशिम जिल्हातील मालेगावमधील नाना मुंदडा शाळेत विद्यार्थ्यांना नित्कृष्ट दर्जाच्या खिचडीचे वाटप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होते आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी तर धक्कादायक प्रकार घडला असून खिचडीमध्ये आळ्या आणि उंदराच्या लेंड्या आढळून आल्या.

Washim | शालेय पोषण आहारात अळ्या, उंदराच्या लेंड्या, वाशिम जिल्ह्यात बालकांच्या जीवाशी खेळ, शिक्षण विभाग गप्प का?
Image Credit source: सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 10:49 AM

वाशिम : ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी यांच्या मुलांना सकस आहार (Healthy diet) मिळावा यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील (Washim District) मालेगाव येथील नाना मुंदडा शाळेत चक्क लहान मुलाच्या खिचडीत अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. धक्कादायक (Shocking) बाब म्हणजे ही खिचडी काही विद्यार्थ्यांनी खाल्ली देखील. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असता पालकांनी जाब विचारण्यासाठी शाळा गाठली.

वाशिम जिल्हातील मालेगावमधील नाना मुंदडा शाळेतील धक्कादायक घटना

वाशिम जिल्हातील मालेगावमधील नाना मुंदडा शाळेत विद्यार्थ्यांना नित्कृष्ट दर्जाच्या खिचडीचे वाटप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होते आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी तर धक्कादायक प्रकार घडला असून खिचडीमध्ये अळ्या आणि उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. यासंबंधितचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. संबंधित प्रकार पालकांना समजल्यानंतर पालकांनी शाळा गाठत शाळेतील शिक्षकांना याप्रकरणी जाब विचारला असता सुरूवातीला कोणीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र, यानंतर असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही पालकांना देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

घडलेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरूच

खिचडीमध्ये अळ्या निघून दोन ते तीन दिवस उलटूनही शिक्षण विभागाने याप्रकरणी साधी चाैकशी ही न केल्याने पालकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांना खिचडीमधून चक्क गाळ्या देण्यात आल्या. मात्र, तरीही याप्रकरणाकडे शिक्षण विभागाने गांर्भियाने न घेता घडलेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचाच प्रयत्न केला आहे. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक करत आहेत, मात्र, शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाळेचे मुख्याधापक सुनील राठी म्हणाले की, यानंतर असा प्रकार घडणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच स्वयंपाक घराची देखील पाहणी करून सुचना दिल्या आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.