हॅपी फेसेस द कान्सेप्ट स्कूल, इंटरअॅक्टिव्ह एज्युकेशन ही संकल्पना राबवणारी अशी ही शाळा

वाशिम येथील हॅपी फेसेस द कान्सेप्ट स्कूल या सीबीएसई माध्यमाच्या शाळेत राबवल्या जातात. इंटरॲक्टिव्ह एज्युकेशन अर्थात परस्परसंवादी अध्यापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

हॅपी फेसेस द कान्सेप्ट स्कूल, इंटरअॅक्टिव्ह एज्युकेशन ही संकल्पना राबवणारी अशी ही शाळा
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 3:37 PM

विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काळानुरूप शिक्षण प्रक्रियेमध्ये नवनवीन प्रवाह उदयास येत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. परंपरागत अध्यापन पध्दतीसोबतच परस्परसंवादी (इंटरॲक्टिव्ह) अध्यापन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत वाढ होते. क्लिष्ट वाटणारे विविध अध्ययन घटक विद्यार्थ्यांना सहज आणि चांगल्या प्रकारे समजतात. आधुनिक शिक्षणाची नेमकी हीच संकल्पना सत्यात उतरवले जात आहे. यासाठी वाशिम येथील हॅपी फेसेस द कान्सेप्ट स्कूल या सीबीएसई माध्यमाच्या शाळेत राबवल्या जातात. इंटरॲक्टिव्ह एज्युकेशन अर्थात परस्परसंवादी अध्यापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात विविध नावीण्यपूर्ण प्रयोग करणारे शाळेचे संचालक दिलीप हेडा हे आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रणालीच्या धर्तीवर शाळेमध्ये ७५ इंचीचे फलॅट इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड लावले आहेत. त्यामुळे १०० टक्के अध्यापन प्रणालीचा स्वीकार करणारी हॅपी फेसेस द कान्सेप्ट स्कूल पहिलीच शाळा ठरली आहे.

नव्या अध्ययन, अध्यापन पद्धतीचा आनंद

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या आरंभी या प्रणालीचे उद्घाटन शाळेच्या कार्यकारी संचालक कविता हेडा यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या अध्ययन, अध्यापन प्रणालीचा विद्यार्थी आनंद घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

हॅपी फेसेस द कान्सेप्ट स्कूलच्या १०० हून अधिक शिक्षक-शिक्षिकांना या नव्या अध्यापन प्रणाली संदर्भात विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षारंभीच्या पहिल्याच दिवशी परस्पर संवादी अध्यापन प्रणालीव्दारे शिकवणी वर्ग सुरू झाले. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

अध्यापन प्रक्रिया रंजक होते

या नव्या अध्यापन पध्दतीअंतर्गत भाषा, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे आदी सर्वच विषयांतील क्लिष्ट वाटणाऱ्या मूलभूत संकल्पना सोप्या होतात. संबोध स्पष्टीकरण प्रत्यक्ष अनुभवातून शिकावयास मिळते. यामुळे अध्ययन, अध्यापन प्रक्रिया रंजक करण्यात शिक्षकांना यश आले आहे.

यासाठी शाळेने आपली विशेष अध्यापन सामग्रीसुध्दा विकसित केली. या नव्या संकल्पनेचे विद्यार्थी आणि पालक वर्गातून स्वागत होत आहे. सन्नती पाटील आणि राघव मंत्री या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना कशी चांगली आहे, हे समजावून सांगितले.

शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत. चांगली प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. शिक्षण हे सहज सोपे वाटायला हवे. ती क्लीष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना कठीण जाते. म्हणून सोप्या पद्धतीचा वापर केला जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.