Washim Crime | वाशिमच्या रुग्णालयात मेस कामगाराची आत्महत्या, गळफास लावून संपविले जीवन
वाशिम जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रुग्णालयाच्या मेसमध्ये तो कामगार म्हणून काम करत होता. घरगुती वादातून ही आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
वाशिम : वाशिमच्या जिल्हा शासकीय रुग्णालय (District Government Hospital) आहे. या ठिकाणी एक मेस चालविली जाते. या मेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराने स्वतःला गळफास लावला. वासुदेव शालीकराम पाटील (Vasudev Shalikram Patil) (वय 30) असं गळफास घेणाऱ्या युवकाचं नाव आहे. आज सकाळी गळफास लावून वासुदेवनं स्वतःचं जीवन संपविलं. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक हा वाशिम जिल्ह्यातील गुंज येथील रहिवासी आहे. वाशिम शहर पोलीस (Washim City Police) घटनेचा तपास करत आहेत.
अशी घडली घटना
वासुदेव हा कामगार म्हणून मेसमध्ये काम करत होता. आज सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाशिम शहर पोलीस घटनास्थळी आले. ते त्यानं आत्महत्या का केली, याचा अधिक तपास करतील. वाशिम जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रुग्णालयाच्या मेसमध्ये तो कामगार म्हणून काम करत होता. घरगुती वादातून ही आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मेसमध्ये होता कामगार
वासुदेव हा गुंज येथील मूळचा रहिवासी आहे. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. गावातून रोजीरोटीसाठी तो शहरात आला होता. मेसमध्ये काम करून पोट भरत होता. अशात त्याने आत्महत्या केल्यानं त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. परंतु, घरगुती वादातून ही आत्महत्या केली असावी, असा प्राथिमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.