भावली धरणाचे पाणी शहापूरला देणार नाही, नरहरी झिरवळांचा पवित्रा

भावली धरणाचे पाणी शहापूरला जाऊच देणार नाही, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला. भावली येथे जलपूजन करत असताना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

भावली धरणाचे पाणी शहापूरला देणार नाही, नरहरी झिरवळांचा पवित्रा
Bhavli dam
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 6:52 PM

नाशिकः इगतपुरी तालुक्याची जलवाहिनी असणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील भूसंपादनाकरिता अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यात. त्यासाठी इगतपुरी तालुक्याच्या शेतकऱ्यांनी मोठा त्याग केलाय. त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासीयांच मिळणार आहे. त्यामुळे भावली धरणाचे पाणी शहापूरला जाऊच देणार नाही, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला. भावली येथे जलपूजन करत असताना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

भावली धरण म्हणजे इगतपुरी तालुक्याला बहाल झालेले निसर्गाचे वरदानच

इगतपुरी तालुक्याला बहाल झालेले निसर्गाचे वरदानच म्हणावे, असे दाटधुके, धबधबे, मुसळदार पाऊस आणि या पावसातच भावली धरणाचा उगम तालुक्यासह उत्तर महाराष्ट्राची तहान भागवत आहे, असंही विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितलं. तसेच त्यांच्याच 29 तारखेला या धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले.

भावली धरण चार दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यातील पहिलेच भावली धरण चार दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाले असून, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी नरहरी झिरवाळ म्हणाले की, गतवर्षी भावली येथील पर्यटनासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून, कोरोना महामारीत राज्य सरकारला अनेक अडचणी आल्यात. त्यामुळे तो निधी आगामी काळात माझ्या माध्यमातून आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्यातून पर्यटनमंत्री यांची भेट घेऊन भावली धरणासाठी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे आमदार खोसकर म्हणाले.

ठाकरे यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार

भावली पर्यटन विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच तालुक्यातील धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी यावेळी दिली. यावेळी काँग्रेस पक्षाचे संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, रामदास धांडे, बाळासाहेब गाढवे, अनिता घारे, भरत आराटे, किरण मुसळे, हरीचंद्र चव्हाण, पिके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, भाऊराव भागडे, पोपटराव भागडे, अरुण गायकर, कैलास घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष वसीम सैयद, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, नारायण वळकंदे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

मनसेची पहिली मोठी घोषणा; नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!

मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, संदीप देशपांडेंकडून खिल्ली

water of Bhavli dam will not be given to Shahapur, the sanctuary of Narhari Jirwal

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.