आम्ही येथे काही फिरायला आलो नाही आमच ऑपरेशन पुर्णत्वाला जाऊंदे आम्ही मुंबई येऊ : भरत गोगोवले
आम्ही स्वखुशीने या ठिकाणी आलो आहेत. जे खूश नव्हते. ते तुमच्याजवळ येऊन बोलत आहे. आम्ही त्या मतावर काही बोलणार नाही.
मुंबई : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामळे आणिबानीची स्थिती उद्भवली आहे. शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत अर्ध्याहून अधिक शिवसेनेचे आमदार आणि काही अपक्ष आपल्या बरोबर आसामला नेले आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसेनेत उभे दोन गट पडले आहेत. त्यात एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा तर दुसरा शिंदे यांनी आता तयार केलेला. त्यामुळे आता राज्यात स्थिती बिकट बनली आहे. त्यावर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगोवले (Bharat Gogovale) यांनाशी सपंर्क केला असता त्यांनी आपली प्रतिक्रीया देताना आम्ही येथे काही फिरायला आलो नाही आमच ऑपरेशन पुर्णत्वाला जाऊंदे आम्ही मुंबई येऊ असे म्हटलं आहे. तर उद्वव ठाकरे यांना जे बोलायचे ते बोलून द्या… आम्हाला जे करायचं आहे ते करूनच आम्ही राज्यात परत येऊ असे म्हटलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पडणार की तरणार अशा स्थितीत आले असतानाच शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादरम्यान काल उद्धव ठाकरे यांना फेसबुक लाईव्ह घेत आपली बाजू मांडली होती. त्यावर आज शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगोवले टीका केली आहे. ते म्हणाले आम्ही स्वखुशीने या ठिकाणी आलो आहेत. जे खूश नव्हते. ते तुमच्याजवळ येऊन बोलत आहे. आम्ही त्या मतावर काही बोलणार नाही.
आम्ही स्वखूशीने येथे आलो आहोत
यावेली शिवसेनेच्या आमदारांना भाजपणे फुस लावत पळवल्याचा आरोप शिवसेने केल्यानंतर आम्ही स्वखूशीने येथे आलो आहोत. आम्हाला कोणीही आणलेले नाही असे गोगोवले म्हणाले. तसेच आम्ही काही तुम्हाला भाडोत्री वाटतो का असा सवाल ही त्या अप्रत्यक्षरित्या ठाकरे यांना केला. जशा तिथं मिटिंग होत आहेत. तशी त्यांची संख्या का कमी होत आहे. आत्ता आम्ही चाळीस लोक आहे. त्यातलं कोण का काही बोलत नाही. सर्व व्हिडिओत येत आहेत. ते वस्तुस्थिती सांगत आहे.
तुमचं संख्याबळ का घटत आहे
तसेच गोगोवले म्हणाले की, सध्या आमची गट हा मोठा होत आहे. तर आमच्या गटात दररोज भर पडत आहे. आम्हाला आमदार येऊन मिळत आहेत. पण तुमच्या गटातील लोक का कमी होत आहे असा सवाल ही त्यांनी केला. तर आमच्या गटात शिवसेनेचे 39 आमदार आहेत. तर काही अपक्षांचीही साथ आम्हाला मिळत असल्याचेही ते म्हणाले.
ऑपरेशन सक्सेस झाल्यावर आम्ही निघू
मुंबईला आम्ही इथलं ऑपरेशन सक्सेस झाल्यावर निघतो. आम्ही असेच फिरायला आलो का, मौजमजा करायला आलो का, साडेतीन लाख लोकांच्यााठी आलोय. तुम्हा ऑपरेशनचं नाव संध्याकाळी सांगतो. चाळीस जण आम्ही आणि अपक्ष दहा आम्ही मिळून नाव ठेवू. कायदेशीर बाबी या तपासून घेऊ, जे काही पाऊल टाकलं आहे. ते सरळ पडायला हवं, दोन दिवस लेट होऊद्या, पण उद्या अडचणी यायला नको.
चर्चा शिंदेच करतील
यावेळी चर्चेची दारे बंद झालीत का असा सवाल केल्यावर त्यावर बोलताना गोगोवले म्हणाले की, हे मला माहिती नाही. शिंदे साहेब बघतिल आता काय करायचं. साहेबांनी जे काही बोलत आहेत. ते बोलूद्या आम्ही त्याबाबत काय आम्ही बोलणार नाही, आम्ही बाळासाहेबांना आदर्श ठेवून चाललो आहे. वेळ येईल तेव्हा बाकी बघू. शिंदे साहेब आणि ते बघतील. आम्ही साहेबांशी थेट बोलणार नाही.