Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा : संग्राम जगताप

अहमदनगर : राजकारणात कोण कशासाठी काय करेन याचा काही नेम नाही. अहमदनगर महापालिकेत झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण आम्ही भाजपला शहराच्या विकासासाठी पाठिंबा दिला, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलंय. अहमदनगरला राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाचा महापौर आणि उपमहापौर निवडून आलाय. मात्र हा निर्णय शहराच्या विकासासाठी घेण्यात […]

नगर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा : संग्राम जगताप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदनगर : राजकारणात कोण कशासाठी काय करेन याचा काही नेम नाही. अहमदनगर महापालिकेत झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण आम्ही भाजपला शहराच्या विकासासाठी पाठिंबा दिला, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलंय.

अहमदनगरला राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाचा महापौर आणि उपमहापौर निवडून आलाय. मात्र हा निर्णय शहराच्या विकासासाठी घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. वाचा राज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे

याविषयी राज्यातील कोणत्याच नेत्यांशी चर्चा झाली नव्हती. तशी कोणाला माहिती देखील नव्हती, तर हा ऐन वेळी झालेला निर्णय आहे. निवडणुकीपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन दिलं होतं, असाही खुलासा संग्राम जगताप यांनी केलाय. वाचाशिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल आम्हाला विकासाचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मी आणि नगरसेवकांनी मिळून हा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला असून याचा वरिष्ठ नेत्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा संग्राम जगताप यांनी केला. वाचाअहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

महापौर निवडणुकीत नेमकं काय झालं?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.