आम्ही सगळ्या निवडणुका युद्ध म्हणून पाहतो, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य…
देशातील कोणत्याही निवडणुकीकडे आम्ही युद्ध म्हणूनच पाहतो, त्यामुळेच आमचा विजय ठरलेला असतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोल्हापूरः निवडणूक आयोगाने नुकतेच गुजरातसह दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपसह देशातील इतर पक्षही आता जोरदारपणे तयारीला लागले आहेत. त्यातच गुजरात आणि दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रच आल्याने भाजपसह आपचे नेत्यांचीही तारांबळ उडणार आहे. त्याच धर्तीवर चंद्रकांत पाटील यांना देशातील विविध भागात होणाऱ्या निवडणुकांविषयी विचारले असता ते म्हणाले की, आमच्यासाठी निवडणुका या नवीन नाहीत कारण भाजपमधील प्रत्येक नेता कार्यकर्ता एका दिलाने लढतो म्हणून आम्हाला यश मिळते असंही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटलांना गुजरात निवडणुकीविषयी विचारले असता ते म्हणाले की, आम्ही सगळ्या निवडणुका या युद्ध म्हणून बघतो त्यामुळे होणाऱ्या निवडणुका या आमच्यासाठी नवीन नसल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील देशात होणाऱ्या निवडणुकीविषयी बोलताना म्हणाले की, निवडणुका कोणत्याही असल्या तरी भाजपचे नेते हे एकत्रितपणे लढतात. त्यामुळेच भाजपचा विजय होतो हेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
गुजरातविषयी बोलताना ते म्हणाले की, गुजरातमध्येच नाही तर देशात कुठंही निवडणूक असेल त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून लढतो.
ज्या प्रमाणे गुजरात आमच्यासाठी महत्वाचा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश या ठिकाणीदेखील आम्ही सर्व नेते मिळून एकत्रच लढतो असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.
त्यामुळे देशातील अनेक भागात होणाऱ्या निवडणुका या आमच्यासाठी महत्वपूर्ण असल्या तरी आमच्या पक्षाचे नेते एका दिलाने लढत असल्यामुळेच आम्हाला त्यात काही नवीन नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.