भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीच सहमती नव्हती – पहाटेच्या शपथविधीच्या अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचं स्पष्टीकरण

भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि (यपुढेही) नसेल असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळला. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्यावेळी नेमकं काय-काय ठरलं होतं याबाबत अजित पवार यांनी नुकताच मोठा गौप्यस्फोट केला

भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीच सहमती नव्हती - पहाटेच्या शपथविधीच्या अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 9:21 AM

भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि (यपुढेही) नसेल असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळला. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्यावेळी नेमकं काय-काय ठरलं होतं याबाबत अजित पवार यांनी नुकताच मोठा गौप्यस्फोट केला. काल इंदापुरमध्ये अजित पवार यांनी मोठा खुलासा केला. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी काल केला होता.

भाजपसोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि  नसेल

शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी काल पहाटेच्या शपथविधी संदर्भात केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी तो दावा फेटाळून लावला. भाजपसाोबत जाण्यासाठी आमची कधीच सहमती नव्हती आणि (यापुढेही) राहणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते अजित पवार ?

“2004, 2009, 2014 आणि 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करते होते”, असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांना टोला लगावला. “देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकलं नाही”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.