ईडी येताच खडसे ‘सीडी’वर नंतर बोलणार?

ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ईडी येताच खडसे 'सीडी'वर नंतर बोलणार?
Eknath Khadse
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 6:10 PM

मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP leader) दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, सीडीसह इतर विषयांवर मी नंतर निवांत बोलेन, आत्ता मला काहीही बोलायचं नाही. (we will talk later about CD says Eknath Khadse after getting summons from ED)

एकनाथ खडसे म्हणाले की, “भोसरीच्या भुखंडाबाबत ही नोटीस आहे. तो व्यवहार मी नव्हे तर माझ्या पत्नीने केला आहे. यापूर्वी चार वेळा माझी याबाबत चौकशी झाली आहे, ही पाचवी वेळ आहे. मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन. याअगोदर भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या नोटीशी आल्या होत्या. त्यांनी सांगितल्यानुसार मी कागदपत्रांसह उपस्थित राहिलो होतो. त्याचप्रमाणे मी ईडीलाही सहकार्य करेन. त्यांनी मला 30 डिसेंबरला हजर राहायला सांगितलं आहे. मला तसं समन्स आलं आहे. मी त्यानुसार उपस्थित रहाणार आहे. मी किंवा माझा प्रतिनिधी उपस्थित राहील”.

एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या किल्ल्याला खिंडार पडण्यास सुरुवात झाली होती. याशिवाय, एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटीचा घोटाळा उघड करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती.

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.

हे होणारच होतं : अमोल मिटकरी

“खडसेंना नोटीस हे होणारच होतं. भाजपविरोधात जो कोणी मोहिम उघडले, त्यांना केंद्रातून नोटीस पाठवण्यात येईल. प्रताप सरनाईकांनी कंगना रानौत आणि अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात आवाज उठवला, हक्कभंग सादर केला. त्यावेळी ईडीने त्यांना नोटीस पाठवली. यापूर्वी शरद पवारांनाही नोटीस पाठवण्यात आली. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळत आहेत, त्याचाच परिणाम म्हणजे ईडीची नोटीस आहे”, असा दावा राष्ट्रवादचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला.

हेही वाचा

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता 

ईडी नाही तर तू सनम बेवफा; मिटकरींचा टोला

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

(we will talk later about CD says Eknath Khadse after getting summons from ED)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.